महाराष्ट्र

एकनाथ शिंदे भाजपात जाणार? राणेंच्या वक्तव्यावर मंत्र्याचे उत्तर

नामदेव कुंभार

एकनाथ शिंदेंचं नारायण राणेंना रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

मुंबई : मी शिवसेनेत समाधानी आहे. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळेच अनेक लोकहिताचे निर्णय मी घेतले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे संभ्रम पसरवत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचे उत्तम काम सुरू असल्याचा निर्वाळा देत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत त्यांची घुसमट होत असल्याचा नारायण राणे यांचा दावा फेटाळला.

एकनाथ शिंदे यांच्या खात्यात ‘मातोश्री’चा व मुख्यमंत्र्यांचा प्रचंड हस्तक्षेप असल्यामुळे एकनाथ शिंदे कंटाळले आहेत. ते पर्यायाच्या शोधात असून लवकरच योग्य निर्णय घेतील, असे वक्तव्य राणे यांनी काल केले होते. यावर शिंदे यांनी आज एका व्हिडिओ प्रसारित करत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की राणेंनी कुठून शोध लावला माहीत नाही. पण त्यात तथ्य नाही. मला माझ्या खात्याचे निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मी माझ्या पक्षात आणि विभागात मोकळेपणाने काम करतो. मी समाधानी आहे. निर्णय स्वातंत्र्य असल्यामुळेच अनेक लोकहिताचे निर्णय मी आातापर्यंत घेऊ शकलो आहे. युनिफाइड डीसीपीआरसारखा लोकहिताचा निर्णय माझ्याच कार्यकाळात झाला. समृद्धी महामार्ग यशस्वीपणे पुढे नेतोय, असेही त्यांनी स्पष्ट केले. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसल्याच्या राणेंच्या दाव्यात अजिबात तथ्य नसल्याचेही ते म्हणाले.

माझ्या कामात ‘मातोश्री’ किंवा मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याच्या वक्तव्यात अजिबात तथ्य नाही. राणे स्वत: मुख्यमंत्री होते. धोरणात्मक किंवा मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच होत असतात, मग खाते कोणतेही असो. उद्या त्यांना मोठ्या निर्णय घ्यावयाचा असला तरी पंतप्रधानांची संमती लागणार आहे. त्यामुळे त्यांचे वक्तव्य हे केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा चिमटा त्यांनी काढला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून राणेंचे संभ्रम पसरवण्याचे काम सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचे उत्तम काम सुरू आहे. यापेक्षा अधिक बोलण्याची गरज नाही.
एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha World Record: "यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बनला वर्ल्ड रेकॉर्ड"; मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आश्चर्याचा धक्का

Manish Sisodia News : जामिनासाठी मनीष शिसोदियांची सर्वोच्च न्यायालयात धाव; याचिकेवर उद्या होणार सुनावणी

Latest Marathi News Live Update : तुघलकाबाद-ओखला मार्गावर ताज एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना लागली आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Taj Express Train Fire: दिल्लीत ताज एक्सप्रेसला भीषग आग, दोन डब्बे जळून खाक

Dombivli Crime : सुपारी देऊन काटा निघण्याआधीच 'त्यानं' काढला काटा; जमिनीच्या वादातून भोईरांची हत्या, विकास पाटलाला अटक

SCROLL FOR NEXT