गृहपाठ केला नाही म्हणून निर्दयी पित्याने आठवर्षीय मुलाला लटकावले पंख्याला! esakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरातील धक्कादायक प्रकार! स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या ५६ वर्षाच्या शिक्षकाने केला दहावीतील मुलीचा विनयभंग; दहावीला आहेस बघून घेतो म्हणून दिली धमकी, शिक्षक फरार

होम मैदानाजवळील एका नामांकित शाळेतील ५६ वर्षाच्या शिक्षकाने एप्रिलमध्ये अंतिम सत्राच्या शेवटच्या पेपर दिवशी नववीतील अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केला. उन्हाळी सुटी संपून पुन्हा शाळा सुरू झाल्यावर चार दिवसांपूर्वी त्याच शिक्षकाने पीडितेचा पाठलाग करून विनयभंग करीत ‘आता तू दहावीत आहे, तुला बघून घेतो’ अशी धमकी दिली. विशेष बाब म्हणजे तो शिक्षक नववी- दहावीतील मुलींना स्वसंरक्षण हा विषय शिकवतो.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : येथील होम मैदानाजवळील एका नामांकित शाळेतील ५६ वर्षाच्या शिक्षकाने एप्रिलमध्ये अंतिम सत्राच्या शेवटच्या पेपर दिवशी नववीतील अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केला. उन्हाळी सुटी संपून पुन्हा शाळा सुरू झाल्यावर चार दिवसांपूर्वी त्याच शिक्षकाने पीडितेचा पाठलाग करून विनयभंग करीत ‘आता तू दहावीत आहे, तुला बघून घेतो’ अशी धमकी दिली. विशेष बाब म्हणजे तो शिक्षक नववी- दहावीतील मुलींना स्वसंरक्षण हा विषय शिकवतो.

मागच्या वर्षी त्याच शाळेतील एका शिक्षकाने मुलीचा विनयभंग केला होता. त्या शिक्षकाविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा त्याच शाळेतील शिक्षकाचा कारनामा समोर आला आहे. एप्रिल महिन्यात शेवटच्या सत्राचा अंतिम पेपर होता. स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकाने पार्किंगमध्ये कोणी नसल्याची संधी साधून हात पकडला. त्यावेळी घाबरून ती तरुणी घरी निघून गेली आणि तिने याबद्दल कोणाला काहीही सांगितले नाही. शाळा सुरू झाल्यावर तो शिक्षक पीडितेवर लक्ष ठेवून होता, तिचा पाठलाग करीत होता.

मागील आठवड्यात त्याने पीडितेला धरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या शिक्षकाने पीडितेला ‘तू आता दहावीच्या वर्गात आहे, मी तुला बघून घेतो’ अशी धमकी दिली. घाबरलेल्या पीडितेने भविष्याच्या चिंतेतून ही बाब आई-वडिलांना सांगितली. हा गंभीर प्रकार ऐकून पीडित मुलीच्या आई-वडिलांनी सदर बझार पोलिस ठाणे गाठले. त्या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलिस निरीक्षक संजिवनी व्हट्टे तपास करीत आहेत.

शाळा म्हणते, १५ दिवसांचेच सीसीटीव्ही फुटेज

मूळचा पुण्याचा असलेला ५६ वर्षीय शिक्षक मागील काही वर्षांपासून त्या शाळेतील नववी व दहावीच्या मुलींना स्वसंरक्षणाचा विषय शिकवतो. मुलीच्या पालकांनी पोलिसांत फिर्याद दिल्यावर शाळेतील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, सीसीटीव्हीचे फुटेज १५ दिवसच साठविण्याची क्षमता असल्याचे कॉलेजकडून सांगण्यात आले. शाळेत तक्रार पेटी दिसत नाही. संशयित आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT