Kandivali Double Murder case esakal
महाराष्ट्र बातम्या

Kandivali Double Murder : मुक्ती मिळणार नाही म्हणून लग्न, तपासात धक्कादायक खुलासे

'अविवाहित मुलीला मुक्ती मिळणार नव्हती, म्हणून तिच्यासोबत लग्न केलं. आता तिचा आत्मा भटकणार नाही.'

सकाळ डिजिटल टीम

'अविवाहित मुलीला मुक्ती मिळणार नव्हती, म्हणून तिच्यासोबत लग्न केलं. आता तिचा आत्मा भटकणार नाही.'

Kandivali Double Murder : मुंबईच्या कांदिवली (Mumbai Kandivali) इथं आई, सावत्र बहिणीची हत्या केल्यानंतर अल्पवयीन मुलीने आणि ६० वर्षांच्या चालकाने आत्महत्या केल्याची घटना ३० जून रोजी घडली होती. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा झालाय. आईचे प्रेमसंबंध असल्याने अल्पवयीन मुलीने चालकाच्या मदतीने ही हत्या केल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून उघड झालं. आत्महत्येपूर्वी चालकाने त्या अल्पवयीन मुलीशी लग्नदेखील केले होते. अविवाहित मुलीला मुक्ती मिळणार नव्हती, म्हणून तिच्यासोबत लग्न केले. आता तिचा आत्मा भटकणार नाही, असं त्या चालकाने चिठ्ठीत म्हटलंय.

कांदिवली (Kandivali) परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील आई आणि दोन मुलींची बुधवारी रात्री हत्या करण्यात आली. हत्या घरात काम करणाऱ्या ड्रायव्हरने (Driver) केल्याचा आरोप होता. ड्रायव्हरच्या मृतदेहाच्या अंगावरील शर्ट मधून पोलिसांना चार पानी चिठ्ठी मिळाली आहे. या चिठ्ठीतून हत्येचे कारण समोर आले आहे. शिवदयाल सेन असे या चालकाचे नाव आहे. तर हत्या झालेल्या महिलेचे नाव किरण (नाव बदलले) असे आहे.

Kandivali Double Murder case

‘प्रिय बाबा, आईचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते’

शिवदयालकडे सापडलेल्या चार पानांमधील एक पान अल्पवयीन मुलीने लिहिलंय. यात ती म्हणते, प्रिय बाबा, आईचे गेल्या दोन वर्षांपासून एका पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. तो आम्हाला खूप त्रास द्यायचा. हे सगळं असह्य झाल्याने आम्ही हे पाऊल उचलले. बाबा आणि भाऊ या दोघांचाही हत्येशी संबंध नाही. मी आणि शिव अंकल यांनी हत्येचा कट रचला होता. बाबा आणि भावाला त्रास देऊ नका, असंही तिने पोलिसांना (Police) उद्देशून म्हटलंय. शिवदयालने चिठ्ठीत म्हटलंय, “किरणने तिच्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला प्रियकराला विकल्याचे मला समजले. या मोबदल्यात किरणला दोन लाख रुपये मिळाले. मी याबाबत किरणला जाबही विचारला होता. किरण आणि तिच्या पहिल्या पतीच्या मुलीने आमच्या हत्येचा कट रचला होता.”

Kandivali Double Murder case

आत्महत्येपूर्वी अल्पवयीन मुलीशी केलं लग्न

६० वर्षांच्या शिवदयाल आणि १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्येपूर्वी लग्न केले. अविवाहित तरुणीने आत्महत्या केली तर तिला मुक्ती मिळणार नाही. म्हणून आम्ही लग्न करतोय, असा उल्लेखही शिवदयालने चिठ्ठीत केलाय. आमच्या पार्थिवांना एकत्र अग्नि द्यावा, असं शिवदयालने चिठ्ठीत म्हटलंय. घटनास्थळी हळद, कुंकूची डबी होती, यावरुन त्यांनी लग्न केल्याचं दिसते, असं पोलिसांनी म्हटलंय.

Kandivali Double Murder case

पोलिसांचे म्हणणे काय?

शिवदयाल आणि १७ वर्षांच्या मुलीने चिठ्ठीत किरणच्या प्रियकराचीही हत्या केल्याचे म्हटलंय. मात्र, घटनास्थळी चार मृतदेह होते. कथित प्रियकर कुठे आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही, अशी माहिती पोलिसांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलीये. किरण यांचे प्रेमसंबंध होते का, हे देखील स्पष्ट झालेलं नाही, असंही पोलिसांनी सांगितले.

किरण यांचे पती इंदौरमध्ये

किरण आणि त्यांच्या पतीमध्ये वाद होता. पती आणि मुलगा इंदोरमध्ये राहतात. तर मुलगी किरणसोबत राहत होती. त्यांच्यासोबत किरण यांची पहिल्या पतीची मुलगीही राहत होती. शिवदयाल या कुटुंबाचा विश्वासू चालक होता. त्याने अल्पवयीन मुलीच्या साथीने हे टोकाचे पाऊल उचलले हे ऐकून इंदौरमध्ये राहणाऱ्या भावाला मानसिक धक्का बसलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT