sanjay raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

Shraddha Murder Case: भरचौकात फाशी द्या; संजय राऊतांची मागणी

सकाळ डिजिटल टीम

 दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्येनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. या ह्त्येमध्ये आरोपी आफताबच्या निर्दयीपणाचीदेखील खूप चर्चा केली जात आहे. या धक्कादायक घटनेनंतर अवघा देश हादरून गेला आहे. तपासात अनेक धक्कादायक खुलासे केले जात आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोपीवर खटला न चालवता थेट फाशी द्या अशी मागणी केली आहे. (Shraddha Murder Case Aftab Amin Poonawala Shraddha Walkar Sanjay Raut )

दिल्लीत २६ वर्षिय श्रध्दाच्या २८ वर्षिय बॉयफ्रेंड आफताबने केलेल्या निर्घूण हत्येने संपूर्ण देशाला हादरवलं आहे. दिल्लीतील श्रद्धाच्या खळबळजनक हत्येबाबत मंगळवारी मुंबईत निदर्शने करण्यात आली. या निदर्शनाचे नेतृत्व भाजप नेते राम कदम यांनी केले. त्यांनी हे प्रकरण 'लव्ह जिहाद' असल्याचे त्यांचे म्हणने आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी दिल्लीत झालेल्या हत्येवर भाष्य केलं. 'वसईतील श्रद्धाची दिल्लीत झालेली हत्या धक्कादायक आहे. कुटुंबीयांचा आक्रोश समजून घ्यावा. ही विकृती आहे. विकृतीच्या पुढची गोष्ट आहे. त्यामुळे आरोपीवर खटला न चालवता भरचौकात फाशी द्या'. अशी मागणी राऊत यांनी यावेळी केली.

आफताब अमीन पूनावाला असं या घटनेतील आरोपी असणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्यानं श्रद्धाचा गळा दाबून तिचा खून केला आणि त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. फ्रिजमध्ये हे शरीराचे तुकडे ठेवून दिल्लीतील वेगवेगळ्या भागात ते फेकून त्याची विल्हेवाट लावण्याचा कट त्यानं रचला होता. हत्याकांड झाल्यानंतर सहा महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताबला ताब्यात घेतलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT