Rupali-Chakankar
Rupali-Chakankar 
महाराष्ट्र

Shraddha Murder Case: श्रद्धाच्या शरीराची विटंबना करणाऱ्या अफताबला फाशी द्या; चाकणकरांची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्रातील वसई भागात राहणाऱ्या श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत हत्या करण्यात आली. तिच्या शरीराची केलेली विटंबना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपीचा तपास केला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. (Shraddha Murder Case Hang Aftab who mutilated Shraddha body demand by Rupali Chakankar)

चाकणकर यांनी म्हटलं की, महाराष्ट्राची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत झालेली निर्घुण झालेली हत्या आणि त्यानंतर तिच्या शरिराची झालेली विटंबना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. ही तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी या घटनेचा तपास करत आरोपीचा छडा लावण्यात यश मिळवलं. पण यामध्ये खरं आव्हान आहे ते या घटनेतील ठोस पुरावे आणि आरोपीविरोधात सशक्त दोषारोपपत्र सादर करण्याचे. याबाबत राज्य महिला आयोगानं राष्ट्रीय महिला आयोगाला पत्राद्वारे कळवलं आहे.

यामध्ये या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा असं या पत्रात नमूद केलेलं आहे. या घटनेबाबत राज्य महिला आयोग सातत्यानं पाठपुरावा करेल असंही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT