Dipak Barde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Love Jihad: मुस्लीम तरूणीशी लग्न केलेल्या श्रीरामपुरातील 'त्या' तरूणाचा खून

सकाळ डिजिटल टीम

श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे एका तरूणाने मुस्लीम मुलीशी विवाह केल्यामुळे त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर नितेश राणे यांनी लव्ह जिहाद आणि हिंदुंना टार्गेट करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहरात मोर्चा काढला होता. दिपक बर्डे असं अपहरण झालेल्या तरूणाचं नाव असून त्याची हत्या केल्याची कबुली अटकेत असलेल्या आरोपीने दिली आहे.

(Shrirampur Crime Latest News)

दरम्यान, दिपकने मुस्लीम मुलीशी विवाह केल्यानंतर त्याचे अपहरण झाले होते. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या एन्ट्रीनंतर या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आणि राणे यांनी अपहरण झालेल्या तरूणाचा शोध लागावा यासाठी श्रीरामपूर येथे मोर्चा काढला होता. लव्ह जिहाद आणि हिंदू तरूणांना टार्गेट केल्याच्या विरोधात त्यांनी एल्गार पुकारला होता पण अपहरण झालेल्या दिपकचा खून केल्याची कबुली आरोपींनी अटकेत असताना दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

श्रीरामपूर येथील आदिवासी समाजातील दिपकचे मुस्लीम मुलीशी प्रेमसंबंध होते. पण मुलीच्या कुटुंबियांचा याला तीव्र विरोध होता. त्यानंतर दोघांनीही घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी दिपकला मारहाण करत मुलीला घरी नेलं होतं. मुलीच्या कुटुंबियांनी तिला पुण्यात मामाच्या घरी ठेवल्याचं कळाल्यानंतर दिपकने पुणे गाठायचं ठरवलं होतं. त्यानंतर तो पुण्याला कामाच्या शोधात जातो म्हणून घरातून निघाला होता पण त्याचे अपहरण करण्यात आले.

दरम्यान, त्याला मारहाण करत त्याचे अपहरण केल्याचं त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी सांगितलं. तर दिपकच्या कुटुंबियांनी त्याच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप केला होता. दिपकच्या वडिलांच्या फिर्यादीनंतर सात आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीने दिपकच्या हत्येची कबुली दिली आहे. मृतदेह गोदावरी नदीत फेकल्याचंही आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT