महाराष्ट्र बातम्या

Chipi Airport: 'शेवटी पायगुण लागतो', मंचावरुनच सुभाष देसाईंचा टोमणा

काही जणांनी विमानतळ सुरु व्हायला इतका विलंब लागला अशी प्रतिक्रिया दिली. पण

दीनानाथ परब

मुंबई: "आज सिंधुदुर्गात चिपी विमानतळाच (chipi airport) उद्घाटन हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. इथून पुढे चिपी विमानतळावरील सर्व विमान उड्डाण फुल असावीत अशी सदिच्छा व्यक्त करतो, असा राज्य सरकारमधील मंत्री सुभाष देसाई (subhash desai) म्हणाले. १९९२ मध्ये तेव्हाचे मंत्री माधवराव सिंधिया यांनी विमानतळासाठी सिंधुदुर्गाची हवाई पाहणी केली होती. आज २७-२८ वर्षांनी हा योग जुळून आला आहे" असे देसाई यांनी सांगितले.

"काही जणांनी विमानतळ सुरु व्हायला इतका विलंब लागला अशी प्रतिक्रिया दिली. पण शेवटी पायगुण लागतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या रुपाने हा पायगुण लाभला आहे. सिद्ध झाला आहे" असा टोला सुभाष देसाईंनी लगावला. चिपी विमानळाच्या उद्घाटन कार्यक्रमात नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थित आहेत. नारायण राणेंचे सुपूत्र नितेश राणे यांनी आज सकाळी शिवसेनेमुळे चिपी विमानतळ सुरु व्हायला सात वर्षांचा विलंब लागला असे विधान केले होते.

"या विमानतळासाठी सातत्याने पाठपुरावा केला. खासकरून विनायक राऊत यांनी 7 वर्षात 1 महिना गेला नसेल की, त्यांनी पाठपुरावा केला नाही. एमआयडीसी सुद्धा पाठपुरावा करत होती. या सगळ्याच प्रयत्नांना यश आल्याचा आनंद आहे. कोकणाचा खरा विकास, उत्कर्षाला आजपासून निश्चित सुरु झाली आहे" असे सुभाष देसाई म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT