Sidhudurg Court on Nitesh Rane case esakal
महाराष्ट्र बातम्या

नितेश राणेंना अटक की जामीन? न्यायालय उद्या देणार निकाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात (Sindhudurg District Court) सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयानं दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला असून उद्या दुपारी ३ वाजता निकाल देण्यात येणार आहे.

न्यायालयानं आमचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. उद्या निर्णय दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर ते न्यायालयासमोर हजर झाले आहे. दोन्ही पक्षानं युक्तीवाद केला. उद्या सर्वांना न्यायालयात हजर राहण्यासाठी सांगितले. आम्ही न्यायालयाला असं निदर्शनास आणून दिलं, की आरोपी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एकदा न्यायालयासमोर हजर झाला म्हणजे कस्टडीत आला आहे. त्यामुळे आधी त्याला कोठडीत घेणं गरजेचं असल्याचं, सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले. आता नितेश राणेंना अटक होणार की जामीन मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

न्यायालयात नेमकं काय घडलं? -

न्यायालयानं आज दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. सरकारी वकिलांनी नितेश राणे शरण आले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयानुसार शरण अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे नितेश राणे यांना अटक करण्यात यावी, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. त्यानंतर नितेश राणेंचे वकील सतीश मानशिंदे यांनी सरकारी वकिलाच्या मागणीला विरोध केला. सर्वोच्च न्यायालयानं दहा दिवसाचा वेळ दिला आहे. आमच्याकडे कायदेशीर प्रक्रियेसाठी वेळ आहे, असा युक्तीवाद मानशिंदे यांनी केला.

दरम्यान, संतोष परब हल्ला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चार दिवसांपूर्वी नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. त्याचवेळी त्यांनी अटकपूर्वी जामिनासाठी अर्ज केला होता. तब्बल चार दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT