महाराष्ट्र बातम्या

Mumbai News : जुहू चौपाटीवर पोहायला गेलेले पाच मुले बुडाली, एकाला स्थानिकांनी वाचवलं

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मुंबईचा प्रसिद्ध अशा जुहू चौपाटीवर सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सहा जण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सहाजण बुडाले. यातील एकाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले. मात्र पाच जण गायब असून नौदल व अग्निशमन दलामार्फत शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

'साम टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार दोन दिवसापासून अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, असा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला आहे.

तरीही सोमवारी सायंकाळी पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास काही तरुण जुहू कोळीवाडा येथे समुद्रात उतरले. समुद्रात तुफान असल्यामुळे उतरू नये, असा सल्ला स्थानिक नागरिकांनी दिला होता. पण स्थानिकांची नजर चुकवून हे तरुण समुद्रात गेल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सहाही जण बुडाले. यातील एकाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह नौदलाला पाचारण करण्यात आले.

सध्या या पाच जणांचा शोध सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळी रुग्णवाहिकेसह पोलिस, अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी समुद्रकिनारी तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT