smart city smart city
महाराष्ट्र बातम्या

स्मार्ट सिटी अभियान गुंडाळणार! कामे पूर्ण करण्याचे आदेश

देशातील १०० शहरांचा सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करून विकास केला जात आहे

माधव इतबारे

औरंगाबाद: स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत मिळालेल्या निधीतील कामे मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करा. स्मार्ट सिटीचा फेज-२ येणार नाही. हा प्रकल्प फक्त पाच वर्षांचाच होता. त्यामुळे मुदतवाढ मिळणार नाही, अशा शब्दात केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाचे उपसचिव कुणालकुमार यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना सोमवारी (ता. २१) बजावले. त्यामुळे आता स्मार्ट सिटी अभियानासाठी नवा निधी मिळणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

केंद्र शासनाने महत्त्वाकांशी स्मार्ट सिटी अभियान २०१५ मध्ये सुरू केले होते. देशातील १०० शहरांचा सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करून विकास केला जात आहे. स्मार्ट सिटी अभियानात सहभागी असलेल्या राज्यातील औरंगाबाद, ठाणे, कल्याण- डोंबिवली, नाशिक, अमरावती, सोलापूर, नागपूर, पुणे, पिंप्री चिंचवड या शहरांची स्मार्ट सिटी बोर्डाचे मुख्याधिकारी व राज्याचे मुख्य सचिव यांची कुणालकुमार यांनी सोमवारी ऑनलाइन पद्धतीने बैठक घेतली. त्यानंतर माहिती देताना महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्याधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी अभियानाला मुदतवाढ दिली जाणार नाही हे कुणालकुमार यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत दिलेल्या निधीचा वापर व त्यातून हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया व वर्कऑर्डरचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण करा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. जे प्रकल्प डीपीआरस्तरावर आहेत त्या प्रकल्पांच्या निविदा काढा, जे प्रकल्प निविदास्तरावर आहेत त्या प्रकल्पांच्या कार्यारंभ आदेश द्या आणि ज्या प्रकल्पांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत ते प्रकल्प तातडीने पूर्ण करा, असेही त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटी अभियानासाठी शासनाकडून देण्यात आलेला निधी जे शहर खर्च करणार नाही त्या शहराचे पैसे लॅप्स होतील असे देखील कुणालकुमार यांनी स्पष्ट केले.

आत्तापर्यं साडेतीनशे कोटींचा खर्च
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला आत्तापर्यंत केंद्र शासनाकडून २९४ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यापैकी २५२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. राज्य शासनाकडून १४७ कोटी रुपये मिळाले, त्यापैकी ९३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. ३४६ कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत, असे श्री. पांडेय यांनी सांगितले. दरम्यान औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने केंद्र सरकारकडून मिळणारे ५०० कोटी रुपये व राज्य सरकारकडून मिळणारे २५० कोटी रुपये अशा एकूण ७५० कोटी रुपयांच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.

स्मार्ट सिटीतील कामे व नियोजित खर्च
सिटीबस सेवा-२३६ कोटी रुपये
सफारी पार्क-२०० कोटी
एमएसआय-१७८.७३ कोटी
रुफ टॉप सोलार-५७ लाख
सायकल ट्रॅक- ३ कोटीं
लव्ह औरंगाबाद, लव्ह हिस्टॉरिकल गेटस्- ७५ लाख
शहागंज येथील टॉवरचे संवर्धन-२९ लाख
ऐतिहासिक दरवाजांचे संवर्धन- ४ कोटी
रेल्वेस्टेशन येथील बसवे- ६५ लाख
संत एकनाथ रंगमंदिर- ७३ लाख
इ-गव्हर्नन्स प्रकल्प-३८ कोटी
स्ट्रिट फॉर पिपल- ८ कोटी
लाइट हाऊस- ६.५० कोटी
छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय- ३५ लाख
ऑपरेशन कमांड अँड कंट्रोल सेंटर- ८ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT