Jayant Patil Canva
महाराष्ट्र बातम्या

...म्हणून मुख्यमंत्र्यांनी केलेलं सूचक विधान महत्त्वाचं - जयंत पाटील

तशी गडबड मला दोन दिवसात दिसतेय.

रश्मी पुराणिक

मुंबई: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी 'आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी' असं विधान केलं. त्या विधानावरुन राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील (jayant patil )यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानावर भाष्य केलं आहे.

"चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे हे भाजपा सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता असेल. कारण शिवसेनेत काही लोक येण्याची शक्यता आहे. तशी गडबड मला दोन दिवसात दिसतेय. हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेलं सूचक वक्तव्य महत्त्वाचं आहे" असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

"मला माजी म्हणू नका. मग दुसरा मार्ग काय आजी होण्याचा? शिवसेनेत येऊन मंत्री होण्याचा एक मार्ग आहे. पुढच्या दोन-तीन दिवसात चमत्कार घडेल अस जे त्यांचं म्हणणं आहे, त्यांना मंत्री व्हायचं असेल तर तो चमत्कार इथेच होईल" असे जयंत पाटील म्हणाले.

"मुख्यमंत्र्यांवर अन्याय करणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांपेक्षा हे नेते भाजपातून शिवसेनेते जाण्याची शक्यता आहे. असं माझ्यासारख्या कायकर्त्याला वाटत आहे. सरकार स्थिर आहे. मतभेद नाहीत, अडचण नाही. कोणाची तक्रार नाही त्यामुळे बाकीचे प्रश्न उदभवत नाही" असे जंयत पाटील यांनी सांगितले. "भाजपा नेते काय म्हणतात, ते दोन वर्ष म्हणत आहेत, त्यांच्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार?" असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tatkal Ticket New Rules : 1 ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; रेल्वे स्थानकांवर लागू होणार नवी टोकन प्रणाली

Who is Saransh Jain? भारताच्या कसोटी संघात एन्ट्री घेणारा सारांश जैन कोण? त्याची निवड श्रीलंका दौऱ्यासाठी का इतकी महत्त्वाची?

Latest Live Updates Marathi : गोदावरीची पूर परिस्थिती सलग आठव्या दिवशी कायम

बापरे! ज्युनियर एनटीआर जखमी, खांद्याला झाली गंभीर दुखापत

India’s Test squad for Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे पुनरागमन, उप कर्णधार बदलला...

SCROLL FOR NEXT