Manisha Kayande Esakal
महाराष्ट्र बातम्या

Manisha Kayande: '...म्हणून मी ठाकरेंची साथ सोडली'; मनिषा कायंदेंनी सांगितलं पक्ष सोडण्याचं मोठं कारण

वैचारिक घुसमट होत होती, जबाबदारी मिळत नव्हती म्हणून मी ठाकरे गट सोडला असंही त्या म्हणाल्यात

अंकिता खाणे (Ankita Khane)

४० आमदार शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे केवळ १५ आमदार होते. आता आणखी एका शिवसेनेच्या एका आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला आहे. विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी काल रविवारी (१८ जून) रोजी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मनिषा कायंदे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार संजय शिरसाट देखील उपस्थित होते. तर, रविवारी मनिषा कायंदे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आज मनिषा कायंदे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, 'मी 2012 साली शिवसेनेत प्रवेश केला. तो बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत. मी आताही त्याच शिवसेनेत आहे त्यामध्ये काणताही बदल केला नाही. फक्त शिवसेनेच्या नेतृत्वात बदल झाला आहे. मी पहिलं मतदान केलं तेही शिवसेनेला. मी कायमच शिवसेनेच काम केलं. मी भाजपमधून शिवसेनेत आले तेव्हापासून मी शिवसेनेसाठी काम केलं आहे. शिवसेना आणि भाजप यांच्या विचारधारा समान आहेत'.

तर 'महाविकास आघाडी आम्हाला कधीच पसंत नव्हती. पक्ष श्रेष्ठी यांना देखील ही महाविकास आघाडी पसंत नव्हती. महाविकास आघाडीची स्थापना पटली नव्हती. महाविकास आघाडीत पक्षाचा बचाव मनापासून करता येत नव्हता. महाविकास आघाडीची विचारधारा पूर्णपणे वेगळी आहे, तरी देखील आम्ही पक्षाची साथ दिली. मला पक्षात चांगलं पद हवं होतं जेणेकरून मला मनासारख काम करता यावं. पण त्यांनी मला मनासारख पद दिलं नाही, काम करण्याची संधी दिली नाही त्याची खंत वाटते असंही मनिषा कायंदे पुढे बोलताना म्हणाल्या आहेत.

मी पद मागत होते, काम मागत होते याबाबत मी पक्षात बोलले पण माझ्या बोलण्याला गांभीर्याने घेतलं गेलं नाही. त्यामुळे कुचंबणा होते. माझी अडचण मी सर्वांना बोलले. मी जबाबदारी मागत होते. लोक सोडून जात होते तेव्हा मी काम मागत होते तेव्हा मला काम करण्याची संधी मिळाली नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.

मी जबाबदारी मागत होते ती दिली नाही. मला राजकारणाची चांगली जाण आहे. मी भाजपमध्ये असतानाही काम केलं. मला काम करण्याची इच्छा होती. पण संधी मिळत नव्हती. या कारणांमुळे मी ठाकरे गटाची साथ सोडली आणि शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे मनिषा कायंदे यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT