Shivsena  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : निवडणुक आयोगावर शंभुराज देसाईंचा दृढ विश्वास म्हणाले, धनुष्यबाण चिन्ह ...

नेमकी शिवसेना कोणाची? या प्रश्नावरती गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं

सकाळ डिजिटल टीम

नेमकी शिवसेना कोणाची? या प्रश्नावरती गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हं गोठवलं. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना वेगळी नावे आणि चिन्हे दिली. यावर सुप्रीम कोर्टात आणि आयोगासमोर यावर वाद सुरूच आहे. त्यानंतर शिवसेना पक्षावर कोणत्या गटाचा अधिकार राहील, या मुद्यावर सुरू असलेली सुनावणी आज पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होत आहे.

आज कदाचित या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर आजच्या सुनावणीच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केद्रीय निवडणुकांबाबत जे जे कागदपत्र, माहिती, पुरावे आम्हाला मागण्यात आले, तेते आम्ही सुपूर्द केलं आहे.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

आमच्याकडे आमदारांचे बहुमत, खासदाराचे बहुमत आणि पक्षातील जिल्हा प्रमुखाचे बहुमतही आहे. या सगळ्याबाबींचा विचार करून अधिकृतरित्या आम्हाला निवडणूक आयोग शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह देईल असा विश्वास शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाईंनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदे आणि 40 आमदार यांनी शिवसेनेत बंड केलं आणि ते बाहेर पडले. त्यांनी भाजपची साथ घेऊन नवीन सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण चिन्हं कोणाचं याबाबत वाद निर्माण झाला. याच वादावर निवडणुक आयोग आणि सुप्रीम कोर्ट सुनावणी घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय

Katraj Accident : कात्रज बोगद्याजवळ दरीपुलावर अपघातात ट्रक चालक ठार, सातजण जखमी

SCROLL FOR NEXT