social work sakal media
महाराष्ट्र बातम्या

पूरग्रस्तांसाठी सामाजिक संस्थांचा मदतीचा हात, 500 किट्सचा पुरवठा

भाग्यश्री भुवड

मुंबई :  रायगडमध्‍ये आलेला महापूर (raigad flood) आणि दरडी कोसळल्यामुळे (landslide) सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले (flood deaths) आहेत. पूराचे पाणी जरी कमी झाले असले तरी संसार पाण्याखाली बुडून गेल्याने नागरिकांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न कायम आहे. या नागरिकांना उभारी देण्यासाठी सामाजिक संस्था (social organization) ही आता पुढाकार घेत आहेत. त्यापैकीच एक स्वदेस फाउंडेशनतर्फे रायगडमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला आहे. ( Social organization helps to flood affected area raigad people to survive-nss91)

रायगडमधील पोलादपूर आणि महाडला या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पूरस्थितीचे योग्‍यरित्‍या व्‍यवस्‍थापन केले नाही तर सुरू असलेल्‍या महामारीमुळे मोठे संकट ओढावू शकते. त्यामुळे, स्‍वदेस फाऊंडेशनतर्फे पुरग्रस्त भागातील नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. आतापर्यंत 23,040 एवढ्या मेणबत्त्या आणि माचिस बॉक्‍सेसचा पुरवठा करण्‍यात आला आहे. पोलादपूर व महाड गावांसाठी 500 वैद्यकीय किट्सचा पुरवठा करण्‍यात आला आहे. या वैद्यकीय किट्समध्‍ये झिंक टॅब्‍लेट्स, ओआरएस, मल्‍टीव्हिटॅमिन कॅप्‍सूल्‍स, अॅण्‍टीसेप्टिक सोल्‍यूशन्‍स, सोडियम हायपोकोराईट निर्जंतुक, बँडेजेस्, मलम, बायोडिन वॉटर सोल्‍यूशन मलम आणि पॅरासीटामोलचा समावेश आहे.  

महाड गावातील पूरग्रस्‍त 80 कुटुंबांना रेशन किट्ससह मदत केली. या रेशन किट्समध्‍ये तांदूळ, गहू, डाळी, तेल, साबण, चहा पावडर, साखर इत्‍यादींचा समावेश होता.  आतापर्यंत 2,040 किराणा माल असलेल्‍या किट्सचा पुरवठा करण्‍यात आला आहे आणि आगामी आठवड्यामध्‍ये आणखी हजार किट्सचा पुरवठा करण्‍यात येणार आहे. पाणीटंचाईचा सामना करणा-या कुटुंबांना पाण्‍याच्‍या बाटल्‍या व पाण्‍याच्‍या कॅन्‍सच्‍या माध्‍यमातून 2,800 लीटरहून अधिक पाण्‍याची व्‍यवस्‍था केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : मालेगावात हलगर्जीपणाचा कळस! मृत शिक्षकाला लावली निवडणूक ड्युटी; गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस

Latest Marathi News Live Update : पक्षाचा आदेश शिरसावंद्य! कोल्हापूर महापालिका निवडणूक लढवणार नाही – कृष्णराज महाडिक

Karuna Munde हिंदूंनी ४ मुलं जन्माला घालावीत म्हणणाऱ्या Navneet Rana ना टोला | Sakal News

Mumbai News: ९०७ हॉटेल, पब, बार, क्लबची झाडाझडती; अग्निशमन दलाकडून आस्थापनांवर कारवाईचा बडगा

Nashik Wine : नाशिकच्या 'रानमेव्या'चा अमेरिकेत डंका; जांभूळ वाइनची पहिली खेप सातासमुद्रापार रवाना!

SCROLL FOR NEXT