solapur

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूरच्या मुंझरीन जेलर झाल्या जिल्हा न्यायाधीश! घरात हिंदी, शिक्षण उर्दूतून अन्‌ इंग्रजीच्या मदतीने घातली यशाला गवसणी

घरात संवादाची भाषा हिंदी व मराठी. माध्‍यमिक शिक्षण उर्दू माध्यमातून. असे असताना पदवीला इंग्रजी विषय घेतला. ही भाषा आत्मसात केली. याच्या जोरावर मुंझरीन जेलर या विद्यार्थिनीने तर थेट जिल्हा न्यायाधीश पदावर झेप घेत यशाला गवसणी घातली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : घरात संवादाची भाषा हिंदी व मराठी. माध्‍यमिक शिक्षण उर्दू माध्यमातून. असे असताना पदवीला इंग्रजी विषय घेतला. ही भाषा आत्मसात केली. याच्या जोरावर मुंझरीन जेलर या विद्यार्थिनीने तर थेट जिल्हा न्यायाधीश पदावर झेप घेत यशाला गवसणी घातली आहे.

सोलापूर शहरातील हिंदी व मराठी भाषिक कुटुंबामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा अवघड असते व ती आपल्याला जमणार नाही असा न्यूनगंड असतो. त्यातील बहुतांश विद्यार्थी हिंदीच्या नजीकची भाषा म्हणून उर्दू भाषेच्या माध्यमात शिक्षण घेतात. चांगल्या करियरच्या संधी या इंग्रजी शिक्षणातून उपलब्ध होतात. मोठ्या पदावर जाण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे व ती वापरता येणे यास महत्त्व आहे. त्यामुळे पदवीस्तरावर इंग्रजी भाषा विषय म्हणून घेतला जावा असा प्रयत्न उर्दू माध्यमाच्या महाविद्यालयाकडून केला जातो. इंग्रजीवर प्रभुत्व मिळविल्याने अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या संधी मिळाल्या आहेत.

मुंजरीन मुजावर या विद्यार्थिनीने पदवीला इंग्रजी भाषा निवडली. त्यामुळे तिने विधी शिक्षणातून थेट जिल्हा न्यायाधीश पदाला गवसणी घातली. हे यश मिळवणारी उर्दू माध्यमाची पहिलीच विद्यार्थिनी आहे. या शिवाय यावर्षी मिसबाह मुजावर हिने हिंदी व उर्दू माध्यमात असताना देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची इंग्रजीची दोन सुवर्णपदके एकाच वेळी मिळवण्याचा विक्रम केला. शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अनेक विद्यार्थिनी इंग्रजीच्या शिक्षिका म्हणून काम करत आहेत.

ठळक बाबी...

  • माध्यम कोणतेही असले तरी इंग्रजी भाषा येणे अनिवार्य.

  • स्पर्धा परीक्षांमध्ये यशासाठी इंग्रजीची गरज.

  • जागतिक ज्ञानाचे माध्यम म्हणून इंग्रजीचा उपयोग अधिक.

विद्यार्थी आत्मविश्वासाने करिअर करतात

आम्ही हिंदी व उर्दू भाषिक विद्यार्थ्यांना सातत्याने इंग्रजीचे महत्त्व पटवून सांगतो. तसेच इंग्रजीत संवाद करता यावा व या भाषेवर प्रभुत्व मिळावे यासाठी उपक्रम घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने करिअर करतात.

- प्रा. डॉ. आसमा खान, विभागप्रमुख, सोशल महाविद्यालय, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli election: अर्ज माघारीनंतर शिराळा राजकारणात भूचाल! ‘निष्ठा विरुद्ध संधी’ संघर्षामुळे पक्षांतराची मोठी लाट उसळली

घरी लग्नकार्य, ४ दिवसांनी अंत्यसंस्कार करायचे; वृद्धाश्रमात निधन झालेल्या आईचा मृतदेह थोरल्या लेकानं पुरून ठेवला

IND vs SA, 2nd Test: मार्करमचा सुपरमॅनसारखा सूर मारत हवेतच एकाहाती कॅच; जडेजा-नितीश रेड्डी पाहातच राहिले; पाहा Video

Navale Bridge Pune: भूमकर ब्रिज ते नवले ब्रिजपर्यंत वेग मर्यादा निश्चित; पुणे वाहतूक पोलिसांचा नवा नियम नक्की वाचा

Latest Marathi News Live Update : कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे नसल्याने शेतमजुराने घेतला गळफास

SCROLL FOR NEXT