solapur city police

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूर शहर पोलिसांची कारवाई! स्वयंघोषित ‘दादा’ 8 दिवसांसाठी होणार तडीपार; महापालिका निवडणुकीपूर्वी ‘या’ गुन्हेगारांची पोलिस ठाण्यांकडून मागविली माहिती

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी शहरातील स्वयंघोषित ‘दादां’ची (रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार) माहिती पोलिस ठाण्यांकडून मागविली आहे. निवडणुकीत मतदारांमध्ये दहशत निर्माण करणे, त्यांच्यावर दबाव निर्माण करून भीती घालण्याचे प्रकार ते गुन्हेगार करतात. त्यामुळे पोलिसांकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी शहरातील स्वयंघोषित ‘दादां’ची (रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार) माहिती पोलिस ठाण्यांकडून मागविली आहे. निवडणुकीत मतदारांमध्ये दहशत निर्माण करणे, त्यांच्यावर दबाव निर्माण करून भीती घालण्याचे प्रकार ते गुन्हेगार करतात. त्यामुळे पोलिसांकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. निवडणूक काळात अशा गुन्हेगारांना आठ-दहा दिवसांसाठी तडीपार केले जाऊ शकते. त्यांची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

सोलापूर शहरात दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची संख्या चार हजारांवर आहे. याशिवाय गंभीर गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या संशयितांचीही संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार (दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असलेले), ज्यांच्यामुळे सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था बिघडू शकते, अशांची पोलिस ठाणेनिहाय यादी तयार केली जाते. सण-उत्सव, निवडणुकीपूर्वी त्या गुन्हेगारांची मागील काही महिन्यांतील वर्तणूक पाहिली जाते. त्यानंतर पोलिस आवश्यकतेनुसार त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करतात. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या गुन्हेगारांच्या वर्तनात सुधारणा होत नाही किंवा झालेली नाही, ते रेकॉर्डवरील गुन्हेगार सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत.

‘या’ कलमांतर्गत तीन प्रकारची कारवाई

  • सण, उत्सव व निवडणुकीच्या काळात सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर भारतीय न्याय सुरक्षा संहितेतील कलम १२६ ते १२९ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. त्यांच्याकडून काही विशिष्ट रकमेचा चांगल्या रकमेचा बाँड (बंधपत्र) लिहून घेतला जातो. तरीदेखील, त्याने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्या गुन्हेगाराकडून तेवढी रक्कम वसूल केली जाते.

  • महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ मधील कलम ५५ ते ५७ अंतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने एक-दोन वर्षांसाठी तडीपार केले जाते. तत्पूर्वी, त्यांचे काही महिन्यांतील गुन्हेगारी कृत्यांची पडताळणी होते. सध्या सोलापूर शहर पोलिसांच्या रडारवर १५ जण आहेत.

  • भारतीय न्याय सुरक्षा संहितेतील कलम १६३ अंतर्गत सण-उत्सव व निवडणुकीच्या काळात सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था बिघडविणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार गुन्हेगारास काही दिवसांसाठी हद्दपार तथा तडीपार केले जाते. अशा गुन्हेगारांची माहिती शहरातील ७ पोलिस ठाण्यांकडून मागविण्यात आली आहे.

...त्यांच्यावर केली जाते कारवाई

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. काही दिवसांत महापालिकेचीही निवडणूक होईल. त्याअनुषंगाने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली जात आहे. सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था बिघडण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कठोर कारवाई केली जाणार आहे.

- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant संतापले! २००९चा खटला अजूनही अडकलेला... देशभरातील न्यायव्यवस्थेला दिला आदेश, पुढे काय होणार?

Marathi Breaking News LIVE: दिल्ली रात्रीचे विमान उड्डाण सलग दुसऱ्या दिवशी रद्द; प्रवाशांचे हाल वाढले

Pune–Kolhapur Highway : पुणे-कोल्हापूर महामार्ग वर्षभरात पूर्ण होणार, नितीन गडकरी यांनी दिला शब्द; रिलायन्सचे काम काढून घेतल्याचीही माहिती

जुई गडकरी की तेजश्री प्रधान! संपत्तीमध्ये कोण आघाडीवर? नेट वर्थच्या रेसमध्ये सायली की, स्वानंदी, कोण आहे पुढे?

Karad Crime: 'चाेरीप्रकरणी शिक्षकासह दाेघांना अटक'; ढवळेश्वर येथून १६ ताेळे हस्तगत

SCROLL FOR NEXT