महाराष्ट्र बातम्या

Solapur News:पोलीस निरीक्षकाला हवा होता मुलगा म्हणून तिसरं अपत्य? निलंबनासाठी सामाजिक कार्यकर्त्याची न्यायालयात धाव

बार्शी ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना २००५ नंतर तिसरे मूल झाले. त्यांनी नोकरी वाचविण्यासाठी दुसऱ्या क्रमांकाची मुलगी दत्तक दिली.

सकाळ डिजिटल टीम

Solapur News: बार्शी ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना २००५ नंतर तिसरे मूल झाले. त्यांनी नोकरी वाचविण्यासाठी दुसऱ्या क्रमांकाची मुलगी दत्तक दिली. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ चे उल्लंघन केल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.

संतोष गिरीगोसावी हे महाराष्ट्र पोलिस विभागात १९९८ पासून कार्यरत आहेत. त्यांना आधी दोन मुली होत्या. पहिली मुलगी नयन (१९९६), द्वितीय मुलगी संस्कृती (१९९९) आहे. २०१० मध्ये त्यांना मुलगा अर्जुन हे तिसरे अपत्य झाले. मुलगा हवा म्हणून त्यांनी असे केल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते काटकर यांनी ॲड. तृणाल टोणपे यांच्यामार्फत त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

लवकरच या याचिकेवर खंडपीठासमोर सुनावणीची शक्यता आहे. यात काटकर यांच्याकडून ॲड. अनिरुद्ध रोटे, ॲड. निकिता आनंदाचे, ॲड. आशुतोष शिंदे, ॲड. सिद्धी जागडे, पूजा तुपेरे हेही काम पाहत आहेत. (Latest Marathi News)

...तर तीन मुले जन्माला घालून दत्तक देतील

महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ च्या कलम तीननुसार दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास कायद्यानुसार ते अमान्य आहे. पोलिस निरीक्षक गिरीगोसावी यांना २००५ नंतर तिसरे मूल झाले आहे. त्यापैकी त्यांनी संस्कृती गिरीगोसावी या पाल्याचा त्याग करून ते दत्तक दिल्याचं सांगितले आहे.

अनेक सरकारी अधिकारी व कर्मचारी मुलाच्या हव्यासापोटी दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देतील आणि दत्तक दिल्याचे सांगतील, हे कायद्याला मान्य नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने याबाबत चौकशी करून कारवाईचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT