solapur city robbery

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

Solapur crime; रेकी करून ७ जणांनी केला ज्वेलर्स दुकान लुटण्याचा प्लॅन, दुचाकीचा रंगही बदलला! ५ दिवस पोलिसांची मेहनत, आयुक्तांचे मार्गदर्शन, १२५ CCTV पडताळले अन्‌...

विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील समर्थ ज्वेलर्स दुकानात दरोड्या टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना पोलिसांनी जेरबंद केले. गुन्ह्यात एक विधीसंघर्षग्रस्त बालकही आहे. लाखोंचे दागिने असलेले ज्वेलर्स दुकान, कामगार आणि ग्राहकांची गर्दी कमी व सहज पळून जाता येईल, अशा दुकानाची दोघांनी रेकी केली होती.

तात्या लांडगे

सोलापूर : विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील समर्थ ज्वेलर्स दुकानात दरोड्या टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना पोलिसांनी जेरबंद केले. गुन्ह्यात एक विधीसंघर्षग्रस्त बालकही आहे. लाखोंचे दागिने असलेले ज्वेलर्स दुकान, कामगार आणि ग्राहकांची गर्दी कमी व सहज पळून जाता येईल, अशा दुकानाची दोघांनी रेकी केली होती. त्यानंतर सात जणांनी मिळून समर्थ ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न केल्याची बाब तपासात उघड झाली आहे. गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिसांनी लिमयेवाडी, मजरेवाडी भागातील सर्वच गल्लीबोळात पोलिस शोध घेत होते. त्यांना पाच दिवसांत यश मिळाले आहे.

गुन्ह्यातील संशयित आरोपी अजिंक्य चव्हाण (रा. वारजे माळेवाडी, पुणे), विशाल जाधव (रा. तुळजापूर), समर्थ समीर गायकवाड, सार्थक दशरथ गायकवाड, अनिकेत पांडुरंग गायकवाड, साहील दशरथ गायकवाड हे १ नोव्हेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास एकत्र आले. दमाणी नगरातील गोल्डन जीमसमोरील मैदानात त्यांनी दरोड्याचा प्लॅन आखला. साहील व समर्थ यांनी दुकानाची रेकी केली आणि दरोड्याचे दुकान निश्चित केले. दरोड्यासाठी त्यांनी पावणेआठची वेळ निवडली. दरोड्यासाठी दोन दुचाकी घेऊन सहाजण दुकानाजवळ पोचले. पण, दुकानदाराच्या आरडओरडीमुळे लोक जमू लागले आणि ३० सेकंदातच ते पसार झाले. सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने साहील गायकवाड, समर्थ गायकवाड, सार्थक गायकवाड व अनिकेत गायकवाड यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्तास जेरबंद केले आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, गौहर हसन सहायक पोलिस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर, शंकर धायगुडे, विजय पाटील, मुकेश गायकवाड, निलेश सोनवणे, तुकाराम घाडगे, दत्तात्रय काळे यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली. अजिंक्य चव्हाण व विशाल जाधव यांचा शोध सुरू आहे.

ओळख लपवण्यासाठी दुचाकीचा रंग बदलला

गुन्ह्यातील संशयित आरोपी अजिंक्य चव्हाणकडे विनानंबरप्लेटची दुचाकी होती. त्या दुचाकीचा मूळ रंग पांढरा होता, पण दरोड्यापूर्वी त्यांनी पोलिसांना ओळखू येऊ नये म्हणून दुचाकीला निळ्या रंगाचा स्प्रे मारला. दरोड्याचा प्रयत्न फसल्यावर सगळेजण लिमयेवाडीतील समर्थ गायकवाडच्या घराजवळ आले. त्याठिकाणी त्यांनी पेट्रोलने दुचाकीचा निळा रंग धुवून काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरोड्यासाठी दुचाकीचा रंग बदलण्याचा पहिलाच प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

१२५ सीसीटीव्ही पडताळले अन्‌...

रात्र होण्यापूर्वीच भर वस्तीतील ज्वेलर्स दुकान लुटण्याचा प्रयत्न झाला आणि ही वार्ता शहरभर पसरली. दरोडेखोर कोण, याच्या शोधासाठी शहर गुन्हे शाखेने सर्वच पथके कामाला लावली. पोलिस आयुक्तही तपासासंदर्भातील माहिती दररोज घेत होते. खबऱ्यांकडूनही माहिती काढणे सुरू होते. विजापूर नाका पोलिसही प्रयत्न करीत होता. पोलिसांनी तब्बल १२५ सीसीटीव्ही फुटेज पडताळले. दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या दुचाकीमागे दुसरी एक दुचाकी जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच दुचाकीचा शोध घेतला आणि गुन्ह्याचा छडा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT