Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरच्या वाझेचं झालं काय? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांच्यात कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. दरम्यान आज पुन्हा सोलापूर पोलिसांच्या स्ट्रिंग आॅपरेशनचे मु्द्दा उपस्थित झाला असून याचे पडसाद विधीमंडळात उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोलापूरचा (Solapur) हा वाझे महिन्याला ६० लाखाची वसुली करतो असा आरोप केला आहे.

सोलापूरचा हा वाझे नेमका आहे तरी कोण असा प्रश्नही फडणवीसांनी उपस्थित केला. या प्रकरणाचे तपास कुठं पर्यंत आले आहेत असा जाब त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. ते म्हणाले, सोलापूरमध्येही एक सचिन वाझे आहे. हा वाझे क्राईम ब्रॅंचसाठी महिन्याला ६० लाखाची वसुली करतो. याचे स्टिंग ऑपरेशन झाले. त्याचा पेन ड्राईव्ह तेथील एका पत्रकाराने सरकारकडे दिल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते वाय. पी. पवार यांनी ही क्लिप मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे दिली आहे. आता याचा तपास नेमका कोठे पर्यंत आला आहे असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला. यामुळे सोलापूरचा वाझे आता चर्चेत आला आहे.

उप निरीक्षक संदीप उर्फ सनी शिंदे हे सोलापूरचे 'सचिन वाझे' असून पोलिस हेडकॉन्स्टेबल अजय पाडावी हे त्यांचे मोहरे आहेत. या दोघांविषयी कोणी अँटी करप्शनला तक्रार केली तर एसीबीचे संजीव पाटील मदत करत असल्याचे आरोप होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT