Solapur Police declare: “DJ ban possible in one hour if MLAs and ministers don’t interfere.” Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यभरात लागू होणार सोलापूरचा डीजेमुक्त मिरवणुकांचा पॅटर्न! यापुढे आता प्रत्येक उत्सवापूर्वी निघणार ‘डीजेबंदी’चे आदेश; जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांचे सोलापूकरांकडून कौतूक

जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांनी डीजेमुक्त व लेझर लाइट शो शिवाय गणेशोत्सवाच्या, ईद-ए-मिलादच्या मिरवणुका काढाव्यात आणि त्याचे पालन सर्वांना बंधनकारक राहील, असे आदेश काढले होते. त्यानुसार दोन्ही उत्सव डीजेमुक्त पार पडले. आता दोन्ही अधिकाऱ्यांचे हेच आदेश यापुढील प्रत्येक उत्सवापूर्वी काढले जातील.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांनी डीजेमुक्त व लेझर लाइट शो शिवाय गणेशोत्सवाच्या, ईद-ए-मिलादच्या मिरवणुका काढाव्यात आणि त्याचे पालन सर्वांना बंधनकारक राहील, असे आदेश काढले होते. त्यानुसार दोन्ही उत्सव डीजेमुक्त पार पडले. आता दोन्ही अधिकाऱ्यांचे हेच आदेश यापुढील प्रत्येक उत्सवापूर्वी काढले जातील आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश काढून जिल्ह्यातील ग्रामीण भागात काढलेल्या जाणाऱ्या सार्वजनिक मिरवणुकांमध्ये डीजे (मोठ्या आवाजाचे वाद्य) व लेझर लाइट शोच्या वापरावर निर्बंध घातले होते. त्यानंतर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी देखील १ सप्टेंबरला स्वतंत्र आदेश काढून शहरातील मिरवणुकांमध्ये तसेच निर्बंध घातले. दोन्ही अधिकाऱ्यांच्या आदेशाला एका सामाजिक कार्यकर्त्याने कोर्टात आव्हान देत आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.

पण, जनहितासाठी जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांनी काढलेले आदेश वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने कायम ठेवले. त्यामुळे यापुढील प्रत्येक मिरवणुकांमध्ये डीजे व लेझर लाइट शो यावर निर्बंध घालण्याचे आदेश कायम राहणार आहेत. जेणेकरून मिरवणुका पाहायला येणाऱ्यांसह मिरवणूक मार्गांवरील शाळा, रहिवासी, उद्योजक, दवाखाने व तेथील रुग्णांना मोठ्या आवाजाचा व प्रखर लाईटचा त्रास होणार नाही. दोन्ही अधिकाऱ्यांनी स्पिकरसाठी परवानगी दिली, पण डीजे आणि मोठ्या आवाजांच्या वाद्यांवर निर्बंध घातले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अधिकाऱ्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अनेक मंडळांवर व डीजेवाल्यांवर कारवाई देखील केली. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट नव्हे तर पारंपारिक खेळ, संस्कृतीचे दर्शन पहायला मिळाले.

पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार...

पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात मागील जयंती-उत्सवातील मिरवणुका पाहायला आलेल्या काहींना डीजे सिस्टिममुळे कानाचा, छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व आले. त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे नमूद होते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसह डॉक्टर्स व अन्य संघटनांनी डीजेच्या दुष्परिणामासंदर्भात निवेदने दिली. त्यामुळे गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर करता येणार नाही. त्याअनुषंगाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३(१) नुसार प्रतिबंध घातला. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम २२३ नुसार कारवाई करण्याचाही इशारा दिला होता.

राज्यासाठी ‘सोलापूर पॅटर्न’चा आदर्श

राज्यात मोठ्या प्रमाणावर सर्वाधिक सण-उत्सव साजरे करणारे शहर, छोट्या-मोठ्या कारणातून आंदोलने, निदर्शने, मोर्चा काढणारे शहर म्हणून अनेक वर्षांपासून सोलापूरची पोलिसांच्या दप्तरी नोंद आहे. तरीदेखील, यंदा पहिल्यांदा सोलापूर शहर-जिल्ह्यातील गणपती विसर्जन, ईद-ए-मिलादच्या मिरवणुका डीजेमुक्त पार पडल्या. हा आदर्श सर्वाधिक सण-उत्सव साजरा करणाऱ्या सोलापूरने राज्यात निर्माण केला आहे. हा पॅटर्न आता यापुढे कायम राबविला जाणार आहे. त्यासाठी डीजेमुक्त सोलापूर कृती समिती आग्रही असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Navy: नववर्षात नौदलाचे सामर्थ्य वाढणार! ‘तारागिरी’, ‘अंजदीप’ युद्धनौका लवकरच सेवेत

Success Story Women Farmers : कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतीतही महिलाराज; उद्योजकतेचा दिला साज

Latest Marathi News Live Update : स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मारकारच देवेंद्र फडणवीस करणार लोकार्पण

Save Tigers: धक्कादायक! देशात १६९ तर राज्यात ४१ वाघांचे मृत्यू; मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४५ वाघांचे अधिक बळी..

Sinnar Accident : मोहदरी घाटात काळजाचा थरकाप! कंटेनरने समोरून येणाऱ्या वाहनांना चिरडले; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT