mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

" .. आणि आव्हाडांचं नाव घेईल" महेश अहिराचं कथित ऑडिओ पुन्हा एकदा व्हायरल Jitendra Awhad

महेश अहिरांची रेकॉर्डींग व्हायरल

रुपेश नामदास

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला मारण्याची धमकी आली होती. याप्रकरणी धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तिहार तुरुंगात जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मारण्याचे आदेश गुंड सुभाष सिंह ठाकूर उर्फ ​​बाबाजीला दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

या क्लिपमध्ये ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांच्या नावाचा उल्लेख होता. दरम्यान पुन्हा एकदा ठाण्याचे सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांच्या नावे काही कथित ऑडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

ही ऑडिओ क्लिप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केली आहे. त्यामध्ये एक व्यक्ती फोनवर बोलताना म्हणत आहे की, "मी स्वत:वर फायरींग करुन घेईल आणि आव्हाडांचं नाव घेईल माझ्यामागे खुद्द मुख्यमंत्री उभे आहेत माझ्या केसालाही धक्का लागणार नाही असं क्लिपमध्ये निदर्शनास आलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काय ट्विट केलं?

माझ्या मुलीला आणि जावयाला ठार मारण्याची भाषा करणाऱ्या महेश आहेर या सरकारी अधिकाऱ्याच्या रूपात वावरणाऱ्या एका कुख्यात गुंडाला हे सरकार पोसत आहे. त्याच्या 8 तासाच्या ऑडियो क्लिप्स आम्ही बाहेर काढल्या आहेत.

त्यात हा मुजोर अधिकारी स्पष्टपणे म्हणतोय की,"मी टाईट होवून सीएमला फोन लावला. मी सीएमच्या "मार्गदर्शनाखालीच काम करतो."मला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फोन आलेत,ते म्हणाले की,"साहेब तुम्ही काळजी करू नका,तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही.

यासोबतच हा आहेर मनपात बसून करोडोंच्या व्यवहारांच्या वार्ता करतोय.जर हा 10 वी पास माणूस इतके मोठे व्यवहार करतोय आणि ठाणे मनपा आयुक्त याबाबत अनभिज्ञ असतील तर मनपा चा कारभार नेमका कसा चालला आहे हे देखील लोकांना आता समजत आहे.

दुसरीकडे "मी सीएम चा मुलगा आहे"अस देखील बोलायला महेश आहेर कमी करत नाही.इतक्या हक्काने तो बोलत असला तर मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट करावं की,आपण या दत्तक घेतलेल्या पुत्राच्या प्रेमापोटी काही कारवाई करत नाही आहात का.?

दाऊद गँग ची संबंधित असणाऱ्या एका कुविक्यात गुंडाला राज्याचे मुख्यमंत्री राजकीय संरक्षण का देत आहेत..? हे नेमक कोणते नात आहे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

Alegaon Paga Murum Scam: आलेगाव पागा पाझर तलावातील कथित अवैध मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती? पर्यावरणप्रेमींची वरिष्ठ चौकशी व फेरपंचनाम्याची मागणी

Sillod Farmer: पीक कर्ज, पाण्याअभावी वाळलेले पीक; सिल्लोड तालुक्यात ३० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपवले

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

SCROLL FOR NEXT