Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : 'काही गोष्टी रात्री करणं सोप्या असतात' असं म्हणत फडणवीसांचं स्मितहास्य

दत्ता लवांडे

मुंबई : रात्री उशीरा घेण्यात येणाऱ्या बैठका, पहाटेचा शपथविधी, मध्यरात्री गायब झालेले आमदार अशा कार्यक्रमामुळे देवेंद्र फडणवीस चांगलेच चर्चेत येत असतात. तर ते मध्यरात्री वेशभूषा करून घराबाहेर पडल्याचंही अमृता फडणवीस यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता मी रात्री अॅक्टिव असतो आणि काही कामं रात्री करायला सोपे जातात असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे.

झी मराठी या वाहिनीच्या खासगी कार्यक्रमात मुलाखत देताना त्यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश पाडला आहे. रात्री मी जास्त अॅक्टिव्ह असतो. काही गोष्टी रात्री करणे सोप्या असतात. असंही ते या कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत. दरम्यान, "देवेंद्रजी मध्यरात्री वेशांतर करू बाहेर जायचे" असा गौप्यस्फोटही फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. तर फडणवीसांनीही 'मी रात्री जास्त अॅक्टिव्ह असतो' असं सांगितलं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर फडणवीसांना बोचरी टीका केली आहे. "आम्ही सरकार चालवलं. अर्ध्या रात्री उध्दवजींनी कॉल केला तरी त्यांच्या सगळ्या गोष्टींचा मान राखला. त्यांना कधीच नाही म्हटलो नाही. मान अपमानाच्या गोष्टी न करता मी स्वत: मातोश्रीवर जायचो."

"कुठेही मान अपमान नाट्य मी केलं नाही. अनेकदा प्रोटोकॉल तोडून माझं भाषण झाल्यावर त्यांना भाषण करायला द्यायचो. एवढं सगळ करूनही तुमचं पटलं नाही, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तो तुमचा निर्णय होता, त्याला आम्ही काय करू शकत नाही" असं ते या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT