महाराष्ट्र बातम्या

Bombay High Court:'८ भावंड असतानाही मीचं का आई-वडिलांना भत्ता द्यावा ?' पालकांविरुद्ध मुलाची न्यायालयात धाव

कौटुंबिक कलहातून पुढे आलेल्या प्रकरणांमधून आपण रक्ताच्या नात्यामध्येच अर्थार्जनावरून वाद निर्माण झाल्याचे पाहतो.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur News: कौटुंबिक कलहातून पुढे आलेल्या प्रकरणांमधून आपण रक्ताच्या नात्यामध्येच अर्थार्जनावरून वाद निर्माण झाल्याचे पाहतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अशाच एका प्रकरणामध्ये पालकांच्या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावणाऱ्या मुलाला पालकांना अर्ज केल्यापासून उदरनिर्वाह भत्त्याची थकीत रक्कम देण्याचे आदेश दिले आहे.

नोकरीला लागल्यापासूनच्या तारखेपासून पालकांना दरमहा ७ हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी, मौदा आणि ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण, मौदाने (मौझा कामठी) मुलाला दिले होते. या आदेशाला आव्हान देत मुलगा किशोर मनगाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

यावर न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, मुलगा किशोर मनगाटे यांना प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी लागली. मात्र, मुलगा आपल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत पालकांनी उपविभागीय अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाकडे धाव घेतली.

सुनावणी दरम्यान, नोकरीला लागल्यापासून पालकांना ७ हजार रुपये दरमहा देण्याचे आदेश ३० ऑगस्ट रोजी न्यायाधिकरणाने किशोर मनगाटे यांना दिले. या विरोधात मनगाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने पालकांनी अर्ज केल्यापासून दरमहा ७ हजार रुपयांची रक्कम पालकांना देण्याचे आदेश दिले. तसेच, थकबाकी जमा करण्याच्या अटीवरच न्यायाधिकरणाच्या आदेशाला स्थगिती देण्यासंदर्भात बाजू ऐकून घेऊ, असेही स्पष्ट केले. पुढील सुनावणी १ डिसेंबर रोजी निश्‍चित केली. पालकांतर्फे ॲड. राजू कडू यांनी बाजू मांडली.(Latest Marathi News)

आठ भावंडे असूनही आदेश मलाच का?

ज्येष्ठ नागरिक उदरनिर्वाह कायद्याच्या नियमानुसार, उदरनिर्वाह भत्ता आदेशाच्या दिवसापासून किंवा अर्जाच्या दिवसापासून लागू केला जातो. तसेच, बाजू मांडण्याची संधी न देता न्यायाधिकरणाने हा आदेश दिल्याचे मुलाने उच्च न्यायालयात दाखल याचिकेत म्हटले आहे. याशिवाय, पालकांनी त्यांना तीन मुले आणि पाच मुली असल्याची वस्तुस्थिती समोर आणली नाही.

अन्य मुला-मुलींना प्रतिवादी न करता न्यायाधिकरणाने हा आदेश काढल्याचे मुलाने याचिकेत नमूद केले आहे. त्यावर, या मुलांपैकी प्रकल्पग्रस्त म्हणून याचिकाकर्त्याला नोकरी मिळाली आहे. त्यामुळे, पालकांची जबाबदारी घेणे याचिकाकर्त्याची जबाबदारी असल्याचे पालकांतर्फे नमूद करण्यात आले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT