Nitin Gadkari Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari: 'हजार कोटींचा पूल बांधून देतो पण..', अडचणीत सापडलेल्या गडकरींच्या मदतीला धावले फडणवीस

चांदणी चौकाच्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी केलं फडणवीसांचं कौतूक

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज पुणे शहरातील चांदणी चौकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे गडकरी म्हणाले आहेत.

पुढे गडकरी म्हणाले की, मी म्हणालो होतो, जमीन अधिग्रहण मला करता येत नाही, हजार कोटींचा पूल लागला तर मी बांधून देईल. जमीन अधिग्रहणांची कामे आडली होती, त्यानंतर फडणवीसांनी नगरोत्थान नावाचं एक हेड काढलं, त्यानंतर सोलापूर, नागपूर, पुणे या भागात जमीन अधिग्रहण आणि शिफ्टिंगची कामे आडली होती, ती कामे फडणवीसांनी सुरू करून दिली, असं सांगतानाच गडकरींनी यावेळी फडणवीसांचे आभार देखील मानले आहेत.

तीन पैकी दोन गोष्टी पूर्णत्वास गेल्याचा आनंद

'ज्या तीन गोष्टी करण्याची मागणी पुणेकरांची होती त्यातील दोन गोष्टी पूर्णत्वास गेल्याचा आनंद आहे. एअरपोर्ट काम पूर्ण झाले आहे, चांदणी चौक पुलाचे काम पूर्ण झाले आहे, मेट्रोचेही काम लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे या गोष्टीचा आनंद आहे', असं नितीन गडकरी म्हणालेत.

पुण्यात हवेतून चालणाऱ्या बसेस आणण्याचा विचार : नितीन गडकरी

पुणे शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच पुण्यातील वाहनांची संख्या देखील वाढली आहे. पुणेकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होण्यासाठी हवेतून चालणाऱ्या बसचा वापर करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. यावेळी गडकरी यांनी पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच कचरामुक्त पुणे करण्यासाठी उपाय सुचवले आहेत. पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या, असंही गडकरी यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० लाखांचं पॅकेज, वर्क फ्रॉम; IT इंजिनिअरने आईला का संपवलं?

Pune Nashik Highway: पिंपळवंडीत तरुणाला मारहाण; कुकडी नदीच्या पुलावरून पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

SCROLL FOR NEXT