Untitled-3.jpg
Untitled-3.jpg 
महाराष्ट्र

विधीमंडळाचं 20 मिनिटांचं अधिवेशन; कुठला झाला महत्त्वाचा निर्णय?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधीमंडळाचं आज एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं. अनुसुचित जाती, जमातींच्या राजकीय आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ देण्याच्या घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला सुरूवात झाली. 

दरम्यान, केवळ 20 मिनिटांच्या या अधिवेशनात एससी एसटी आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. संसदेत एससी-एसटी आरक्षण मुदतवाढीचं विधेयक आधीच संमत झालं. आता विधीमंडळातील या अधिवेशनात आरक्षण मुदतवाढीच्या विधेयकाच्या पाठिंब्याचा ठराव करण्यात आला.

भारतीय संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019 संसदेत संमत झालं. त्यानंतर आता राज्यांकडून या विधेयकाला पाठिंबा देणारे ठराव केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्राच्याही विधीमंडळाने या विधेयकाला पाठिंब्याचा ठराव संमत केला. यासाठी विधीमंडळाचं 20 मिनिटांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं.

हे विशेष अधिवेशन नवीन वर्षातील पहिलंच अधिवेशन असल्याने राज्यपालांचं अभिभाषणही झालं. दोन्ही सभागृहामध्ये राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवण्यात आलं. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव, संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019 च्या समर्थनाचा ठराव असं एकूण कामकाज विधीमंडळात झालं.

आपल्या अधिवेशनात राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी पुढे जाईल आणि काम करेल असं सांगितलं. तसेच सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध राहिल, असंही नमूद केलं. यावेळी नाना पटोले यांनी आपण ओबीसींचाही विचार करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने वारंवार ओबीसींचा आकडा नक्की किती हे विचारलं. त्यामुळे ओबीसींबाबत एक प्रस्ताव आणत आहोत. त्यालाही संमती द्यावी.”

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील संविधान सभेतील चर्चांचा संदर्भ देऊन आरक्षणाच्या महत्त्वावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणावरील मताचाही उल्लेख केला.

दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं स्वागत केलं.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT