Anil Deshmukh Sakal
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुखांचा सीबीआय कोठडीतला मुक्काम वाढला

देशमुखांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे

धनश्री ओतारी

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे देशमुखांचा सीबीआय कोठडीतला मुक्काम वाढला. तसेच, देशमुखांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.( Special CBI Court rejects default bail Maharashtra's former Home Minister Anil Deshmukh)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर ईडीने देशमुखांना अटक केली होती. त्यानंतर सीबीआयनेही कारागृहात जाऊन देशमुखांची गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी केली होती.

सीबीआयने देशमुख आणि त्यांचे कथित सहकारी स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्यावर आरोपपत्र दाखल केले असून बडतर्फ पोलीस अधिक्षक सचिन वाझेला माफीचा साक्षीदार कऱण्यात आले आहे. त्याप्रकऱणात देशमुख यांनी डिफॉल्ट जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने अद्याप देशमुखांना दिलासा दिलेला नाही.

दाखल केलेले आरोपपत्र केवळ ५९ पानांचे असून आरोपपत्र अपूर्ण आहेत. तसेच ताब्यात घेतल्याच्या ६० दिवसांच्या आत चौकशी पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच तपास पूर्ण झाल्याशिवाय अपूर्ण आरोपपत्र दाखल करण्यात आल्यामुळे देशमुख डिफॉल्ट जामीनासाठी पात्र असल्याचा दावाही देशमुखांनी याचिकेतून केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT