Anil Deshmukh Sachin Waze CBI Custody e sakal
महाराष्ट्र बातम्या

संजीव पलांडे, कुंदन शिंदे, सचिन वाझेला सात दिवसांची सीबीआय कोठडी

प्रकृती अस्वास्थ्यामुळं अनिल देशमुख रुग्णालयात दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टानं संजीव पलांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे यांना सात दिवसांची अर्थात ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयनं कोर्टानं सुनावणीदरम्यान या तिघांसाठी १० दिवसांची कोठडी मागितली होती. (Special CBI Court sent Sanjeev Palande Kundan Shinde Sachin Waze to CBI custody till April 11)

दुपारपासून सुरु असलेल्या या सुनावणीत विशेष सीबीआय कोर्टानं संजीव पलांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे याचा ताबा सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, या खंडणी प्रकरणात ४०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची नवी बाब उघड झाली आहे. त्यामुळं याच्या सर्वंकश चौकशीसाठी सीबीआयनं या आरोपींची दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. पण कोर्टानं दहा ऐवजी सात दिवसांची कोठडी मान्य केली. त्यामुळं या तिघांची आता ११ एप्रिलपर्यंत सीबीआयची कोठडीत रवानगी होणार आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक आरोपी असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळं सीबीआयनं रुग्णालय प्रशासनाकडून आणि तुरुंग प्रशासनाकडून देशमुख यांच्या प्रकृतीबाबत अहवालाची मागणी केली.

या खंडणी प्रकरणात ईडीनं अनिल देशमुख यांच्यासह संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली होती. तर एनआयएनं सचिन वाझे यांनी अटक केली. पलांडे आणि शिंदे हे अनिल देशमुख यांचे जवळचे सहकारी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France unrest Explained: फ्रान्स का पेटला? 'Block Everything' म्हणजे काय अन् मॅक्रो राजीनामा देणार का?

Rajgad Crime : रानडुक्कर शिकार प्रकरणी सात जण अटकेत; राजगड तालुक्यातील बोरावळे गावात घडला प्रकार

Nepal Violence: 'जेन-झीं'नी निवडला देशाचा नेता! माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांच्याकडे नेतृत्वाची धुरा

Jalna News : समृद्धी महामार्गावर चोरीच्या उद्देशाने ‘ठोकले खिळे’ सोशल मीडिया व प्रसार माध्यमावर व्हिडीओ व्हायरल मुळे खळबळ

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT