NCP Political Crisis Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Political Crisis: राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणी घडामोडींना वेग; दोन्ही गटाला कागदपत्र, पुरावे सादर करण्यासाठी दिली तारीख

NCP Political Crisis: राष्ट्रवादीच्या अपात्रता याचिकेवरील सुनावणीसाठी 12 दिवसांचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांसमोर ही सुनावणी होणार आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याबबातच्या कायदेशीर लढाईला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या अपात्र आमदाराच्या प्रकरणाची ही सुनावणी शिवसेना अपात्र आमदाराच्या सुनावणीच्या धर्तीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर होणार आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी वेगवेगळे दावे केले आहेत. राष्ट्रवादीच्या अपात्रता याचिकेवरील सुनावणीसाठी 12 दिवसांचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांसमोर ही सुनावणी होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आमदार अपात्रप्रकरणी आज दोन्ही गटाला याचिकेसाठी अधिक माहिती देण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे.

आजच दोन्ही गटाला सर्व कागदपत्र तसेच पुरावे गोळा करण्याची वेळ देण्यात येणार असल्याची माहिती आहे.उद्या सर्व कागदपत्रे पटलावर ठेवल्यानंतर, ९ तारखेनंतर कोणतेही नवे कागदपत्रे सादर करता येणार नाही.त्यामुळे कागदपत्रे आणि इतर माहिती जोडण्यासाठी दोन्ही गटाकडे आजचाच दिवस असणार आहे. यामध्ये प्रतिज्ञापत्रे, पक्षासंबधींची सर्व कागदपत्रे दोन्ही गटाकडून सादर केली जातील.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. अजित पवार गट शिवसेना-भाजपसोबत सत्तेत सामील झाल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पड ली आहे. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी आपलीच असून राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षांवर दावा केल्याने शरद पवार गट देखील प्रचंड आक्रमक झाला आहे. ही लढाई कायदेशीर पध्दतीने लढली जात आहे.

राष्ट्रवादी आमदार अपात्र वेळापत्रक ठरलं

६ जानेवारी - राष्ट्रवादीचे दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सोपविली जातील.

८ जानेवारी - याचिकेसाठी अधिकची, अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ.

९ जानेवारी - फाईल्स किंवा अधिकची, अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणणे. मात्र, ९ तारखेनंतर ऎनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जोडता येणार नाही. अशा मागणीचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.

११ जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्रे तपासेल.

१२ जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा दुसरा दिवस. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल.

१४ जानेवारी - सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस.

१६ जानेवारी - विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी. सुनावणीचे विषय नक्की केले जातील.

१८ जानेवारी - प्रतिज्ञापत्र सादर करणे.

२० जानेवारी - अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी

२३ जानेवारी - शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी

२५ आणि २७ जानेवारी - राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant Injury: टीम इंडियाला धक्का! रिषभ पंतला बॉल लागला, पायातून रक्त आलं, गाडीत बसून सोडावं लागलं मैदान; Video

Revanth Reddy : रेवंत रेड्डींनी उपराष्ट्रपती पदाबाबत सूचवलं ‘हे’ मोठं नाव, अन् म्हणाले...

Navi Mumbai: नवी मुंबईतील बेकायदा धार्मिक स्थळांना दिलासा, नेमकं प्रकरण काय?

Sangli Youth Endlife : तांदूळवाडी येथील तरुण अभियंत्याने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Mumbai News: आता केस पेपरसाठी रांग लावावी लागणार नाही, पालिका रुग्णालये होणार पेपरलेस; कधीपासून? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT