Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: सेनेनंतर राष्ट्रवादीतही फूट, अजित पवार सरकारमध्ये होणार सामील

राज्यात राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग अला असून देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाल्यानंतर अजित पवार हे राजभवनात दाखल झाले आहेत.

राहुल शेळके

Ajit Pawar: राज्यात राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग अला असून देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाल्यानंतर अजित पवार हे राजभवनात दाखल झाले आहेत. देवगिरी बंगल्यावरील बैठकीतून राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रुफल्ल पटेल हे बैठकीतून बाहेर पडले होते.

राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा  अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र आहे.  राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे. असे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

रविवारी, 1 जुलै रोजी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे दोन्ही कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. यासोबतच दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दौलत दोराडा आदी नेते पोहोचले होते. बैठक आटोपल्यानंतर अजित पवार घरातून थेट राजभवनाकडे रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगर- मनमाड महामार्गाच्या कामाला सुरुवात

Sharad Pawar: राज ठाकरेंसाठी शरद पवार आग्रही; काँगेसलाही दिला मेसेज, उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

Horoscope Prediction 2025: उद्या तयार होतोय केंद्र त्रिकोण योग, शनिदेवाच्या आशीर्वादाने मेष अन् मिथुनसह 'या' 5 राशींचे उजळेल भाग्य

Couvade Syndrome: चक्क पुरुषांनाही जाणवतात प्रेग्नन्सीसारखी लक्षणं? जाणून घ्या काय आहे ‘कूवाडे सिंड्रोम’

SCROLL FOR NEXT