Shrikant Shinde vs Aditya Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

वरळी सोडून डोंबिवलीतून निवडणूक लढवून दाखवा; श्रीकांत शिंदेंचं आदित्य ठाकरेंना थेट आव्हान

रवींद्र देशमुख

मुंबई - शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात सातत्याने एकमेकांवर आरोप करण्यात येत आहेत. आदित्य ठाकरे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करताना दिसतात. मुख्यमंत्री शिंदे घाबरून गेले, असा दावा आदित्य यांनी केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

श्रीकांत शिंदे म्हणाले की, काही लोकं लायकी सोडून बोलले. त्यांना बालबुद्धी म्हटलं जातं, हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आहे. मुख्यमंत्री हे घाबरून गेले, असा दावा करणं अत्यंत हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री हे दिल्लीत नक्षलवादी गतविधीच्या बैठकीला गेलेत, असंही श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्हटलं.

पहिले मुख्यमंत्री २४ तास घरी असायचे. त्यांना कोण घाबरणार. सध्याचे मुख्यमंत्री दीड वर्षापासून दिवसरात्र काम करत आहेत. तर आधीचे मुख्यमंत्री ऑनलाईन येऊन गरम पाणी प्यायला लावायचे. मात्र आमचे मुख्यमंत्री ग्राऊंडवर जावून काम करायचे. तब्येत ठीक नसताना मुख्यमंत्री दोन तास डोंगर चढून इर्शाळवाडीत आढावा घेण्यासाठी गेले होते, असंही श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना वरळीतून निवडणूक लढवून दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंनाच डोंबिवलीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT