Sharad Pawar Resigns Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey : सर्वेक्षणातील प्रश्न हायपोथेटीकल पण, लोकांना काय वाटतं हे स्पष्ट; श्रीराम पवारांचं निरीक्षण

रोहित कणसे

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात चर्चा आणि गदारोळाला सुरुवात झाली. राज्याच्या राजकीय वर्तुळात या विषयाची जोरदार चर्चा सुरु असताना पवारांच्या या निर्णयाबद्दल सकाळ - साम टीव्हीने केलेल्या सर्वेक्षणाचा निकाल नुकताच समोर आला आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर राष्ट्रवादी पक्षातील ७३ टक्के लोकांना त्यांनी अध्यक्षपदावर कायम राहावं असं वाटतंय.तर पवारांचा हा निर्णय योग्य आहे असं म्हणत २४.६ टक्के लोकांनी शरद पवारांच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. इतरही सहकारी पक्षातील नेत्यांनी शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडू नये अशी भूमिका मांडली आहे. यादरम्यान सकाळ साम सर्व्हेचा अर्थ काय? या प्रश्नावर सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी उत्तर दिलं आहे.

श्रीराम पवार म्हणाले की, शरद पवारांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडू नये असे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना वाटतं. पण त्यातही ३६ टक्के लोकांना त्यांनी निर्णय घ्यावा असं वाटतं. म्हणजेच महाराष्ट्रात काही प्रमाणात असे लोक आहेत की त्यांना शरद पवारांनी निर्णय घेणे आणि त्यांचा निर्णय हे देखील मान्य आहे.

अजितदादांनी बाहेर पडून भाजप बरोबर जावं का? ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व पक्षांच्या समर्थकांना पचनी पडली नसून याला सर्वांकडून विरोध आहे. तर अजित पवारांनी असं केलंच तर सरकार स्थिर राहील का? तर बऱ्याच जणांना हे असं सरकार स्थीर राहाणार नाही असं वाटतं. यातले सर्व प्रश्न हायपोथेटीकल आहेत पण लोकांना काय वाटतं याचं हे उदाहरण आहे असे श्रीराम पवार म्हणाले.

श्रीराम पवारांनी पुढे बोलताना सांगितले की, शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहीले तर काय होईल? तर पक्षाला नवा अध्यक्ष निवडावा लागेल. अध्यक्ष निवड ही पूर्णपणे पक्षाची अंतर्गत बाब असेल तरी हा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे पक्षात काय व्हावं याबद्दल सामान्यांना राजकीय कार्यकर्त्यांना आपापली मते असतात. ही मते जाणून घेतली तर प्राधान्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे या सर्वात पुढे आहेत. त्यानंतर अजित पवार आणि त्यानंतर जयंत पाटील आहेत, हा एक मु्द्दा सर्व्हेमध्ये पुढे आला आहे.

शरद पवार जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नसतील तर त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर याचा परिणाम होईल असे या सर्व्हेत मते नोंदवलेल्या लोकांना वाटतं असेही श्रीराम पवार यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT