ssc-hsc Exam
ssc-hsc Exam  sakal media
महाराष्ट्र

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार ? राज्य शिक्षण मंडळाने दिला प्रस्ताव

संजीव भागवत

मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे (ssc-hsc students) मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु झालेले नसल्याने मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होणाऱ्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा (ssc-hsc written exam) पुढे ढकलण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन बैठक घेऊन दहावी बारावीच्या लेखी, प्रात्यक्षिक आदी परीक्षा यांची तयारी, नियोजन आदींचा आढावा घेतला.

तसेच विद्यार्थ्याचे झालेले लसीकरण याची माहिती घेतल्यानंतर शिक्षण विभागाने या परीक्षा यांच्या नव्याने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी मंडळाला दिल्या आहेत. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या लेखी परीक्षा आणि त्याचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दहावी तसेच बारावी या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील निर्णायक परीक्षा असतात. गत दोन वर्षापासून कोविड संक्रमणामुळे शिक्षण व परीक्षा पध्दतीमध्ये बदल झालेला आहे.

ऑनलाईन शिक्षण पध्दत आणि प्रत्यक्ष वर्गातील शिकवणी यामध्ये फरक आहे. इंटरनेट अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थी बरेचदा ऑनलाईन शिकवणीपासून वंचित राहतात. या बाबींचाही सर्वांगीण विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून परीक्षा पध्दतीचे नियोजन व्हावे, अशी सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिल्या.

मागील वर्षभरात ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. लिखाणाच्या सवयी अभावी विद्यार्थी परीक्षेत कमी पडू नये यासाठी या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अर्ध्या तासाचा वाढीव वेळ मिळावा. सध्या परिवहन महामंडळाच्या संपामुळे ग्रामीण भागातील एसटी बसेस नियमित सुरु नाहीत. बरेच विद्यार्थी गावात शाळा नसल्यामुळे शिक्षणासाठी इतर गावात जातात. असे विद्यार्थी वाहतूकीच्या सोयी अभावी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी ‘शाळा तेथे केंद्र’ देण्यात यावे.

अथवा अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करता येईल का, याबाबींचाही विचार करण्यात यावा, असेही निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिले. परीक्षा प्रक्रिया राबवितांना सीबीएससी बोर्ड प्रमाणे परीक्षा घेता येतील का, याचेही नियोजन करण्यात यावे. तसेच ऑनलाईन अभ्यासक्रम किती टक्के पूर्ण करण्यात आला आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल त्वरीत सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

लसीकरणाबाबत नियोजनपूर्वक कार्यपध्दती राबवा

दरम्यान, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वयोगट 15 ते 18 मधील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. जिल्ह्यामध्ये या लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. या लसीकरणाला वेग येण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य विभागाने समन्वयाने काम करावे. जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे, यासाठी मायक्रोप्लॅनिंग करण्यात यावे. या परीक्षांच्या तारखा पुढे करता आल्यास विद्यार्थ्यांना वेळ मिळेल. यासाठी शिक्षण विभाग, विद्यार्थी तसेच पालक यांच्यात समन्वयाने पुढील कार्यपध्दती निश्चित करण्यात यावी. तसेच याबाबतचा अहवाल येत्या आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

"शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज दहावी बारावीच्या परीक्षा आणि त्याच्या नियोजनावर आढावा बैठक घेतली. त्यात लसीकरण न झालेल्या विद्यार्थी आदींचा विचार करुन परीक्षेच्या नियोजनात बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे मंडळाकडून तातडीने परीक्षा आणि त्याच्या नियोजनात बदल करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो सरकारकडे पाठवला आहे. त्यावर निर्णय झाल्यास मंडळ आपले नियोजन करेल."

- शरद गोसावी, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT