SSC and HSC Board Sakal
महाराष्ट्र बातम्या

SSC-HSC Exam : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षांपूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय

या संदर्भातील पत्रदेखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे.

सकाळ डिजिटल टीम

SSC-HSC Exam : येत्या २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

मात्र, त्याआधीच बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देऊ नये असे आदेश केंद्रांना दिले आहे. याआधी अपवादात्मक परिस्थितीत १० मिनिटे उशीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता.

मात्र, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात यावा असे आदेश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे पेपरला मुकावे लागू शकते.

21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता घेतली जाणार आहे.

परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. या संदर्भातील पत्रदेखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे.

उशीरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र, यावेळी त्यात बदल करण्यात आले आहे. त्यानुासर गेल्यावर्षी परीक्षेसाठी देण्यात आलेली होम सेंटर पद्धत बंद करण्यात आली आहे. तसेच दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT