Gunratn Sadavarte  
महाराष्ट्र बातम्या

ST Bank Election : डंके की चोट पे ! एसटी बँक निवडणुकीत सदावर्तेंच्या पॅनलचा एकतर्फी विजय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेची २३ जून रोजी राज्यभरातील २८१ मतदान केंद्रावर निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा आज निकाल लागला असून यात एसटी कामगार संघटनेचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला आहे. कॉटन एक्सचेंज बिल्डिंग, कॉटन ग्रीन येथे मतमोजणीला पार पडली.

सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाचा सर्व १९ जागांवर विजय झाला आहे. मध्यरात्री पर्यंत ही मतमोजणी पूर्ण झाली नव्हती. आज ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने बाजी मारली. एसटी महामंडळातील प्रस्तापित संघटनांना सदावर्ते यांच्या पॅनलने मोठा धक्का दिला आहे.

कोरोना महामारिनंतर एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण, ७ वा वेतन आयोग अशा मुख्य मागण्यांसाठी सुमारे साडे पाच महिने चाललेल्या एसटी कामगारांचा संपाचा परिणाम एसटी बँकेच्या निवडणुकीत दिसून आला आहे.

विविध पक्षांच्या प्रस्तापित कामगार संघटनांना दूर करत नव्याने एसटी महामंडळात आलेल्या दोन संघटनांनी प्रचंड मुसंडी मारली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दोन्ही संघटनेने बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा ही जादा मतदान घेतले आहे. यातही सदावर्ते यांच्या पॅननले एकतर्फी विजय मिळवला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कामगार सेनेच्या पॅनल मात्र, पिछाडीवर गेले असून, ७ व्या क्रमांकावर दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT