ST BUS sakal
महाराष्ट्र बातम्या

शालेय विद्यार्थ्यांना आता वेळेतच एसटी बस! बस रद्द झाली, बसला उशिर झाल्यास करता येणार थेट ‘या’ क्रमांकावर तक्रार; परिवहन मंत्र्यांचा आगारप्रमुखांना सज्जड दम

सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख विद्यार्थी रोज एसटी बसमधून ये-जा करतात. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेला जाताना किंवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास त्यांना आता थेट मदत मागता येणार आहे. एसटी बस वेळेवर आली नाही, अचानक बस रद्द झाली, अशावेळी विद्यार्थ्यांना हेल्पलाईनवरून मदत मागता येणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख विद्यार्थी रोज एसटी बसमधून ये-जा करतात. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेला जाताना किंवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास त्यांना आता थेट मदत मागता येणार आहे. एसटी बस वेळेवर आली नाही, अचानक बस रद्द झाली, अशावेळी विद्यार्थ्यांना हेल्पलाईनवरून मदत मागता येणार आहे. यासाठी महामंडळाने १८००२२१२५१ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल.

शालेय विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत शाळा-महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी देखील विभाग नियंत्रकांना संपर्क करून समस्या मांडू शकतात. बस उशिरा सुटणे किंवा अचानक रद्द झाल्यामुळे शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचे तास चुकतात, परीक्षेला वेळेवर पोहोचू शकत नाहीत. काही वेळेला त्यांची महत्त्वाची परीक्षा देखील बुडते. विद्यार्थ्यांच्या अशा शालेय नुकसानीला आता संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक, त्यांचे पर्यवेक्षक जबाबदार धरले जाणार आहे.

जितके दिवस विद्यार्थ्यांचे नुकसान; तितके दिवस अधिकारी निलंबित

सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ५-६ या वेळेत मुख्य बसस्थानक व ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची चढ-उतार जास्त असते, अशा थांब्यावर संबंधित आगार पर्यवेक्षकांनी गणवेशात थांबून वाहतुकीचे नियोजन करावे. शाळेचा शेवटचा मुलगा बसमधून सुखरूप घरी जाईपर्यंत संबंधित पर्यवेक्षकांनी तेथून हलू नये. तसेच शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार विद्यार्थ्यांनी किंवा शाळा- महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी केल्यास जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल, तितके दिवस जबाबदार पर्यवेक्षक किंवा संबंधित अधिकारी निलंबित, सक्तीचे रजेवर पाठवण्यात येतील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

शाळा सुटल्यावर तासात विद्यार्थी जावा घरी

शालेय विद्यार्थ्यांसाठी मासिक पासमध्ये ६६.६६ टक्के सवलत दिली जाते. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत मासिक पास दिला जातो. संध्याकाळच्या वेळी शाळा- महाविद्यालय सुटल्यानंतर किमान तासात मुले त्यांच्या घरी पोचावेत. परंतु, बस वेळेवर न आल्याने, अचानक रद्द झाल्याने मुलांना घरी पोचण्यास खूप उशीर होतो. त्यामुळे त्यांना पालकाची ओरड खावी लागते. अनेकदा गैरसमजातून पालकांनी विद्यार्थ्यांना शिक्षाही केल्या आहेत. काहींना शाळा सोडावी लागली तर काहींनी आत्महत्याही केल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही हेल्पलाइन उपयुक्त ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What IS Gold Rate Today : सोन्याने सलग तिसऱ्या दिवशी घेतली उसळी, चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील १० ग्रॅमचा आजचा भाव

Crime News: भीतीदायक घटना! गाडीवर कोयता नाचवत पुण्यात रस्त्यावर दहशत माजवणारा तरुण, नागरिकांनी थांबवलं अन् मग काय घडलं?

'मी आलियाची मोठी चाहती' फॅनच्या प्रश्नाला श्रद्धा कपूरच उत्तर, म्हणाली...'आमच्यासाठी कथा...'

Pune Metro : पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो मार्गांचे काम सहा महिन्यांत सुरू होणार; पुणे शहरातील मेट्रोचे जाळे ११० किलोमीटरपर्यंत विस्तारले जाणार

NCP leader Ram Khade : शरद पवार यांच्या नेत्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला, प्रकृती चिंताजनक; टोळक्याने आधी गाडी फोडली अन्...

SCROLL FOR NEXT