MSRTC esakal
महाराष्ट्र बातम्या

ST संप मागे! काय झाल्या वाटाघाटी? वाचा सरकारच्या 10 प्रमुख घोषणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: गेल्या 54 दिवसांपासून महाराष्ट्रात एसटी कामगारांचा संप सुरु आहे. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण व्हावं, या मागणीसाठी कर्मचारी अडून बसले होते. सरकारने या दरम्यान कर्मचाऱ्यांना पगारवाढ देखील देऊ केली मात्र, विलीनीकरणावर कर्मचारी ठाम राहिली होते. हे प्रकरण हायकोर्टाच्या अखत्यारित असल्याने त्याबाबत नेमलेली त्रिसदस्यीय समिती जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका राज्य शासनाने घेतली होती. अखेर, आता कर्मचारी संघटना आणि राज्य शासन यांची बैठक होऊन वाटाघाटीनंतर तोडगा निघाला आहे. या वाटाघाटीनंतर सरकारने काय घोषणा केल्या आहेत आणि नेमक्या वाटाघाटी काय झाल्या? याबाबतचे प्रमुख दहा मुद्दे...

  • स्थानिक कर्मचाऱ्यांनी कामावर उद्यापासून यावं, तर परगावच्या कर्मचाऱ्यांना यामध्ये अधिक सवलत महामंडळाकडून देण्यात आली असून त्यांनी परवापासून रुजू व्हावं, असं सांगण्यात आलंय.

  • हायकोर्टाच्या त्रिसदस्यीय समितीचा जो अहवाल येईल, तो मान्य करु, असं आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलं आहे.

  • कर्मचाऱ्यांनी संपत माघार घ्यावी , आम्ही त्यांच्यावरचे कारवाई मागे घेऊ, असंही वचन त्यांनी दिलं आहे.

  • कर्मचाऱ्यांना दहा तारखेच्या आत वेळेवर पगार मिळणार, असं आश्वान दिलं आहे.

  • कामगारांच्या मेडिक्लेम, विमा आणि या आर्थिक मागण्यांवर चर्चा केली जाईल.

  • फौजदारी कारवाई ज्यांच्यावर झाली आहे , ती कायदेशीर बाबी तपासून मागे घेऊ

  • आत्महत्या केलेल्या कमचाऱ्यांचे पोलीस अहवाल मागवले असून ती प्रकरणे तपासू आणि त्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत महामंडळ विचार करेल

  • दिलेली पगारवाढ तशीच राहणार आहे. संपाच्या दरम्यानच्या काळात महामंडळाने 5 हजार रुपये १ ते १० वर्ष सेवा देणाऱ्यांसाठी, १० ते २० वर्ष सेवा देणाऱ्यांना ४ हजार आणि २० वर्षाहून अधिक काम करणार्यांना अडीच हजार रुपये पगारवाढ दिली आहे.

  • आर्थिक मागण्यांच्या बाबतीत त्यांची मागणी होती की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना पगार हवा होता, आम्ही त्यावर चर्चा करायला तयार आहोत, असं परिवहन मंत्र्यांनी म्हटलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT