महाराष्ट्र बातम्या

एसटीची VTS प्रकल्पाचे घोंगडे भिजत, गेल्या तीन वर्षांपासून व्हिटीएसची प्रतिक्षाच

प्रशांत कांबळे

मुंबईः  एसटीच्या बसेसची माहिती प्रवाशांना मोबाईल आणि स्थानकांवर लावण्यात आलेल्या टिव्ही संचावर मिळावी यासाठी महामंडळाने रोजमेट्रा कंपनीला नोव्हेंबर 2017 मध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमचे 36 कोटीचे कंत्राट दिले होते. त्यानंतर नाशिक विभागात प्रकल्पाची यशस्वी चाचणी झाल्यानंतर नऊ महिन्यातच राज्यातील सर्व बसेसमध्ये व्हिटीएस उपकरण लावायचे होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पाचे भिजत घोंगडे असून अद्यापही व्हिटीएस प्रकल्पाच्या त्रुट्याच पूर्ण झाल्या नसल्याचे दिसून येत आहे.

बस स्थानकावर प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर बसचे लोकेशन आणि वेळ तपासता यावी, त्यासाठी एसटी महामंडळात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हिटीएस)प्रकल्प लावण्यात येणार होता. नाशिक विभागात यशस्वी चाचणीनंतर मुंबई –पुणे –मुंबई, बोरीवली - पुणे -बोरीवली, ठाणे –पुणे –ठाणे या मार्गावरील शिवनेरी सेवेमध्ये या प्रणालीचा वापर केल्यानंतर आणि वेळोवेळी मुदतवाढ दिल्यानंतर व्हिटीएस प्रकल्प 2019 अखेर पूर्ण करण्यात येणार होता. 

तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या प्रणालीचे ऑगस्ट 2019 मध्ये मुंबई सेंट्रल मुख्यालयामध्ये प्रारंभ केला होता. मात्र, 2019 अखेर आणि यावर्षातही ही व्हिटीएस प्रणालीच्या त्रुट्याच पूर्ण करण्यात या कंपनीला वेळ लागत असल्याने, व्हिटीएस प्रकल्प प्रतिक्षेतच आहे. शिवाय तीन वर्ष होऊनही प्रकल्प पूर्णच होत नसल्याने, प्रवाशांना सेवा देण्याचा एसटीच्या उद्देशालाही हरताळ फासले आहे. 

ही सुविधा मिळणार होती प्रवाशांना

या नव्या प्रणालीमुळे एसटी बस कोणत्या ठिकाणी पोहोचली आहे, हे प्रवाशांना समजू शकणार होते, तसेच बसस्थानकावर एलसीडी टिव्ही संचाद्वारे एसटी गाड्यांची प्रत्यक्ष येण्याची आणि सुटण्याची वेळ कळणार होती. शिवाय आपल्या जवळील थांब्यावरून प्रत्यक्ष येणाऱ्या आणि सुटणाऱ्या फेऱ्यांची वेळ कळणार असल्याने प्रवाशांना प्रवासाचे पूर्वनियोजन करता येणार होते.

तत्कालीन मंत्र्यांचा उद्देश

प्रकल्पाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या एसटी बस थांब्याचे, गावांचे जीपीएस तंत्रज्ञानाव्दारे अक्षांश आणि रेखांशाव्दारे नकाशावर स्थान निश्चित करण्यात येणार होते. तसेच ज्या आंतरराज्य मार्गावर एसटी महामंडळाची सेवा आहे अशा थांब्याचेही स्थान निश्चितीकरण करून, व्हिटीएस प्रकल्पाला जोडावे, त्यासोबतच एसटीच्या 18 हजार बसेसच्या दैनंदिन 67 प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी कामकाजात सुसूत्रता आणणे तसेच संपूर्ण कार्यक्षमतेने काम होण्यासाठी एसटीने माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, त्याचाच एक भाग म्हणून एसटीत व्हिटीएस राबविण्याचा निर्णय रावते यांनी घेतला होता. 

कोरोनामुळे एसटीची सेवा बंद होती. त्यामुळे व्हिटीएसचे काम थांबले होते. मात्र आता, व्हिटीएस प्रणालीच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामध्ये काही तांत्रिक त्रुट्या आहे. त्यापूर्ण केल्या जात आहे. शिवाय अनेक स्थानकांवरील व्हिटीएस टिव्ही संच सुरू आहे.

राहूल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ

--------------------------

(संपादनः पूजा विचारे)

ST VTS project waiting last three years Revenue from online advertising plummeted

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

IND vs PAK : टीम इंडियाचं वाकडं करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानची ICC कडे तक्रार; तिथे कोण बसलाय हे ते बहुधा विसरलेत...

Pune Water Crisis : नळाच्या पाण्यात आढळल्या चक्क अळ्या; वैदूवाडी, आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजवून संताप व्यक्त

Amboli Ghat Accident: 'आंबोली घाटामध्ये टेम्पो दरीत कोसळला'; ब्रेक निकामी झाल्याने दुर्घटना, चालक सुखरूप

Nashik Central Jail : नाशिक कारागृहात 'ॲलन कार्ड' घोटाळा: शिपाई आणि बंदीविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT