Supriya Sules security will be enhanced Supriya Sules security will be enhanced
महाराष्ट्र बातम्या

ST Strike : सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ होणार

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर निदर्शने केली. शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानाबाहेर निदर्शने करीत घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या निवासस्थानावर चप्पले फेकली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनाही विरोधकांच्या रोषाला बळी पडावे लागले होते. त्यामुळे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या सुरक्षेत वाढ होणार असल्याची माहिती आहे. (Supriya Sules security will be enhanced)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे जवळपास चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. सरकार विलीनीकरण न करण्यावर ठाम आहे. हे आंदोलकांना अनेकदा सांगून झाले आहे. तरीही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपण्याचे नाव घेत नाही आहे.

गुरुवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी आंदोलकांना शेवटची संधी देत २२ एप्रिलपर्यंत नोकरीवर परतण्याचे आवाहन केले होते. असे न केल्याच आम्ही आमचा निर्णय घेण्यास मोकळे होणार असल्याचे म्हटले होते. यामुळे चिडलेल्या शंभराहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर हल्ला केला होता.

यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते. कर्मचाऱ्यांनी बंगल्यावर चप्पल आणि दगडफेक केली होती. अचानक एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. या हल्ल्याप्रकरणी १०७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनाही विरोधकांच्या रोषाला बळी पडावे लागले होते.

आंदोलकांनी गैरवर्तन केल्याचे काही अहवालात म्हटले आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या वतीने कोणतीही तक्रार किंवा निवेदन देण्यात आलेले नाही. सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता. आता सुरक्षेच्या दृष्टीने सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ होणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

Manchar News : कलमोडी प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास राज्य शासनाची मान्यता; आंबेगाव व खेड तालुक्यातील ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

MSRTC : गारगोटी आगाराची १८ लाख कमाई; आदमापूर यात्रेसाठी सहा दिवसांत साडेपाचशे जादा फेऱ्या

Water Plant Negligence : अन्यथा कळंबा फिल्टर हाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावू; नगरसेवकांचा इशारा, ‘बी वॉर्ड’ चे दुरवस्थेवर बोट

SCROLL FOR NEXT