MSRTC Strike News sakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांनी शब्द दिलाय; कामावर या! कृती समितीचे ST कर्मचाऱ्यांना आवाहन

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली.

सह्याद्री इथ एस. टी. कर्मचाऱ्यांचे संपाबाबत शरद पवार (Sharad Pawar),परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यासह संबंधित एस.टी. विभागातील अधिकारी, संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये विविध संघटनांनी आपण समाधानी असल्याचं सांगत सर्व शंकांचे निरसन झाल्याचं म्हटलं.

एसटी कृती समितीच्यावतीने बोलताना सांगण्यात आलं की, शरद पवारसाहेब आणि अनिल परब यांच्यात बैठक पार पडली. कृती समितीच्या वतीने आम्ही काही मुद्दे मांडले आहेत पहिल्यांदा दोन महिने संम्प सुरू आहे. संपाबाबत सविस्तर चर्चा झाली. सातवा वेतन आयोगासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिलंय. कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होतेय. निलंबित व बडतर्फ झालेल्यांना एसटी सुरू झाल्यावर निर्णय घेतला जाईल असं आम्हाला सांगितलंय. बांधवांनो विचार करा, विलिनीकरणाची लढाई कोर्टावर सोपवूया आणि कामावर येवूया असं आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आलं.

एसटी कामगार सेनेच्या कार्यध्यक्षांनी सांगितलं की, सर्व कामगार सेनेच्या सभासदांना आवाहन करतो की, एसटी जगली तर आपण जगणार आहे. आपण सर्वांनी महामंडळाच्या कामावर रुजू व्हावं, एसटी सुरु करावी, आपल्यावर कारवाई होणार नाही याची ग्वाही मिळाली आहे. जर तुम्हाला कोणता त्रास झाला तर आम्ही तुमच्यासाठी हजर राहू.

कृती समितीमधील सदस्य मुकेश तिगोटे म्हणाले की, संपाच्या अनुषंगाने प्रदीर्घ चर्चा बैठकीत झाली. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे अशी मागणी या बैठकीत आम्ही मांडली.. पगार वाढ झाली होती, त्रुटी असल्या तरी त्यावर विचार करू असे आश्वासन आधी दिलं होतं.पण कर्मचारी संपावर ठाम आहेत. संघटनांशी आमचं काही घेणं देणं नाही असं कर्मचारी म्हणतायत. पण एसटी चालू होतं नाही , तो पर्यंत मार्ग निघणार नाही. न्यायालयीन लढाई करू पण नोकरी वाचवून करू. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजु व्हावं अशी विनंती मुकेश तिगोटे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्या IAS अधिकाऱ्यासाठी ममतांनी PM मोदींचा आदेश धुडकावला, TMC हरताच दिला राजीनामा

Team India: वैभव सूर्यवंशीची भारतीय T20 संघात निवड, शुभमन गिलसोबत सलामी; महान क्रिकेटपटूने निवडला संघ

Maharashtra Female Foeticide Monitoring: कन्याभ्रूण हत्येवर लगाम : राज्य तपासणी व संनियंत्रण समितीवर आमदार स्नेहा दुबे-पंडित यांची नियुक्ती

Pune Parvati Crime : पर्वतीतील नऊ वर्षीय मुलीवरीरील अत्याचारप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Maharashtra NPS Reform: राज्य शासनाचा मोठा निर्णय: सुधारित एनपीएसमुळे शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांना हमी निवृत्तीवेतन

SCROLL FOR NEXT