eknath shinde 
महाराष्ट्र बातम्या

Shetkari Samvad Yatra: सरकार शेतकऱ्यांच्या 'दारी'... योजनांची देणार माहिती! शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ

Sandip Kapde

Shetkari Samvad Yatra: शिवसेनेच्या शेतकरी सेनेच्या वतीने राज्यभरात सुरू होणाऱ्या शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ आज ठाणे येथील टेंभीनाका येथे करण्यात आला. ही यात्रा राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती देणे, त्यांना त्या योजनांचे थेट लाभ मिळवून देणे तसेच वेगळ्या पद्धतीने शेती करून शेती फायद्यात आणून दाखवणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांशी त्यांचा संवाद साधून त्यांना नाविन्यपूर्ण शेतीबाबत अवगत केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे शेतकऱ्यांबद्दल कायमच संवेदनशील होते. त्यांच्याच प्रेरणेतून सुरू करण्यात आलेल्या शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेना शेतकरी सेनेचे पदाधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. त्यातील काही प्रश्नांचे जागच्या जागी निराकरण करण्यात येणार असून मी स्वतः त्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्याचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

यावेळी शेतकरी सेनेचे अध्यक्ष धनंजय जाधव, नाथराव कराड, समन्वयक योगेश्वर रायते तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले प्रगतिशील शेतकरी आणि शेतकरी सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge: नवले पुलावरील अपघातांना बसणार आळा! लवकरच सुरू होणार नवा पर्यायी मार्ग; प्रवाशांना मोठा दिलासा

New Frog Species: नागालँडमध्ये बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध; पुण्यातील भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या शास्त्रज्ञांचा संशोधनात सहभाग

Petrol-Diesel-CNG Price: CNG महागल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Team India Matches Today: वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा अन् स्मृती मानधना एकाच दिवशी मैदानात! केव्हा, कुठे रंगणार आज सामने; एका क्लिकवर वाचा

Suresh Borse Death Case : शिक्षक मृत्यू प्रकरणी PSIसह अंमलदार निलंबित; अटकेची प्रक्रिया सुरू; संशयितांना वाचवण्याचा होता प्रयत्न

SCROLL FOR NEXT