सोलापूर : रिझर्व्ह बॅंकेने 7 मे 2011 रोजी राज्य सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्ती केली. त्यावेळी बॅंकेला एक हजार 69 कोटींचा तोटा होता. त्यातून मार्गक्रमण करीत बॅंक आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे. 31 मार्च 2020 अखेर बॅंकेला एक हजार 345 कोटींचा ढोबळ नफा झाला असून 325 कोटींचा निव्वळ नफा झाल्याचे बॅंकेकडून सांगण्यात आले.
आरबीआयच्या निकषांपेक्षा बॅंकेचे भांडवल 13.11 टक्क्यांनी अधिक झाले आहे. प्रति कर्मचारी व्यवसाय 2018 च्या तुलनेत वाढला असून तो आता 43 कोटींवर पोहचला आहे. बॅंकेचे सभासद, कर्मचाऱ्यांच्या विश्वासामुळे व परिश्रमामुळे बॅंकेला मोठे यश प्राप्त झाल्याचे बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. बॅंकेने 109 वर्षांत प्रथमच मोठे यश मिळवल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. बॅंकेने आपले कार्यक्षेत्र कारखान्यापुरतेच मर्यादित न ठेवता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, पतसंस्था, हौसिंग सोसायट्यांसह अन्य सहकारी संस्थांना कर्जपुरवठा केला. त्यांनी कर्जदारांनी कर्जाची नियमित परतफेड केल्याने बॅंक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचे बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. आर. देशमुख यांनी सांगितले.
बॅंकेने सुरु केली 'आत्मनिर्भर' योजना
कर्जदाराच्या एकूण येणे कर्जाच्या 25 टक्के रक्कम संबंधित कर्जदारास एक वर्षाच्या सवलतीच्या कालावधीसह पुढील पाच वर्षाच्या मुदतीने फेडण्याची सवलत दिली आहे. अडचणीतील उद्योगांसाठीही बॅंकेने कर्ज पुनर्बांधणी योजना जाहीर केली आहे.
ठळक बाबी...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.