MSC Bank Sakal
महाराष्ट्र बातम्या

लसीकरणाचा खर्च उचलणार; कर्मचाऱ्यांसाठी राज्य सहकारी बँकेची तयारी

राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याची तयारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने दर्शविली असून, तसा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याची तयारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने दर्शविली असून, तसा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला आहे.

राज्यातील सहकारी बँकिंग कार्यक्षेत्रात सर्व जिल्हा सहकारी बँका, सर्व नागरी सहकारी बँका, नागरी बँकांच्या सर्व जिल्हा असोसिएशन फेडरेशन येथील संचालक, अधिकारी आणि सर्व प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोना लसीबाबत राज्य सरकार लवकरच धोरण जाहीर करणार असून, ज्या वयोगटासाठी मोफत लसीचे धोरण निश्चित केले जाईल, त्याव्यतिरिक्त १८ वर्षांवरील सहकारी बँकिंग क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्य बँक घेणार आहे.

राज्य बँकेच्या स्वत:च्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ३१ जिल्हा बँकांमध्ये सुमारे २० हजार २४ आणि नागरी बँकांमध्ये सुमारे एक लाख ९० हजार कर्मचारी आहेत.

पुणे जिल्ह्यातील कर्मचारी संख्या ९ हजार ८०० इतकी असून, मुंबईस्थित ६० बँकांमधून २० हजार ३०८ इतका कर्मचारी वर्ग कार्यरत आहे.

रुग्णालयांसोबत सामंजस्य करार

प्रत्येक जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेची मदत घेण्याबरोबरच जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयांसोबत सामंजस्य करार करून प्रत्येक कर्मचाऱ्यास ''विशेषधिकार वैद्यकीय सेवा ओळखपत्र देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यासाठी जहांगीर रुग्णालयासोबत याबाबत बोलणी सुरु असून जहांगीर रुग्णालयाने प्रत्येक बँकेच्या ठिकाणी सर्व सोयींनी सुसज्ज कार्डियाक रुग्णवाहिकेसह दोन डॉक्टर आणि आवश्यक स्टाफसह दिवसाला सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या सेवेसह कर्मचाऱ्यांना ''प्रिव्हेलेज कार्डच्या माध्यमातून सर्व वैद्यकीय सेवांवर सवलत असेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी राज्य सहकारी बँकेच्या मुंबईस्थित मुख्य कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात सहकारी बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता ग्राहक सेवा देत अर्थव्यवस्था गतिमान ठेवण्याचे कार्य केले आहे. अशा कोविड योद्ध्यांप्रती कृतज्ञता तसेच राज्यातील सर्व सहकारी बँकांचे पालकत्व स्वीकारलेली शिखर संस्था म्हणून ही जबाबदारी घेताना राज्य बँकेच्या मनात कर्तव्यपूर्तीची भावना आहे.

- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

आरोग्यासाठी खजूर ठरतोय 'नॅचरल सुपरफूड'! पण किती अन् कधी खावे जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Odisha Elephant: ओडिशात १८ महिन्यांत ११४ हत्तींचा मृत्यू; सरकारची विधानसभेत माहिती, संरक्षणाचे प्रयत्न, काय आहेत कारणे?

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

SCROLL FOR NEXT