चंद्रपूर : देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona update) हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता काही राज्यांमध्ये अनलॉक (Maharashtra Unlock) करण्यात येतंय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला संबोधित केलं. कोरोना आणि कोरोना लसीकरणाबाबत (corona Vaccination) घेण्यात आलेय निर्णयाबाबत त्यांनी देशाला माहिती दिली. लसीकरणासाठी ठोस पावलं उचलण्यात येतील असंही मोदी म्हणाले. मात्र आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. चंद्रपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. (state Congress president Nana Patole criticized PM Narendra Modi)
राज्यव्यापी दौऱ्यावर असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रात्री उशिरा चंद्रपुरात पोचले. त्यांनी आरोग्य विभागाने अधिग्रहित केलेल्या स्थानिक क्राईस्ट रुग्णालयाला भेट दिली. म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांची भेट घेत सुविधांविषयी माहिती करून घेतली.
२१ जूनपासून सर्व राज्यांना मोफत लस पुरवल्या जातील अशी घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, केंद्र सरकारला ही योजना फार उशिरा सुचली. हा निर्णय या आधीच व्हायला हवा होता. तसंच जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होता तेव्हा राहुल गांधींनी केंद्र सरकारला सतत कोरोनाच्या लाटेविषयी अवगत केलं मात्र केंद्र सरकार निवडणुकीच्या मागे होते. जेव्हा कोरोनामुळे नागरिकांचा मृत्यू होत होता तेव्हा मोदी बंगालच्या निवडणुकीत व्यस्त होते अशीही टीका नानांनी केली.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो लावणार नाही असा निर्णय घेतला म्हणून केंद्र सरकारला लस मोफत देण्याबद्दल सुचलं की काय? असा खोचक सवालही नाना पटोलेंनी केला. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरिबांना आता दिवाळीपर्यंत मोफत धान्याचं वाटप करण्यात येणार आहे अशी घोषणाही मोदींनी केली. मात्र केंद्र सरकारनं धान्याऐवजी गरिबांना थेट रक्कम देऊ करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
सध्या केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशात पेट्रोल, डिझेलची दरवाढ झाली असून महागाईचा आगडोंब उसळला आहे. काँग्रेसच्या मनमोहन सिंह सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या इंधनाचे दर प्रति बॅरल १३७ डॉलर होते; तरी आमची सरकार ६० ते ७० रुपये प्रतिलिटर पेट्रोल देत होती. पण, मोदी सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर प्रतिबॅरल ४७ डॉलर एवढे कमी झाले असतानाही पेट्रोलने थेट शतक गाठले आहे. कोरोनाची दुसरी लाट असतानाही निवडणुका घेतल्या. मार्चमध्ये देश कोरोनामुक्त झाल्याची टिमकी वाजवली. त्यामुळे हे संकट गंभीर झाल्याची टीका त्यांनी केली.
(state Congress president Nana Patole criticized PM Narendra Modi)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.