2020
2020 
महाराष्ट्र

'न्यू इयर'साठी पार्टी करायचा विचार करताय? मग हे वाचाच!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नववर्षाच्या जल्लोषाला अवैध आणि भेसळयुक्त मद्याची बाधा होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाला आहे. राज्यभरात ४४ भरारी पथके नेमण्यात आली असून, अन्य राज्यांतून होणाऱ्या मद्यतस्करीला चाप लावण्यासाठी १२ तपासणी नाक्‍यांवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगरे-वर्मा यांनी दिले आहेत.

नाताळ ते नववर्षादरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध मद्य आणि गावठी दारूची वाहतूक व विक्री होते. अन्य राज्यांतून चोरट्या मार्गाने मद्याची वाहतूक केली जाते. या प्रकारांना चाप लावण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. भरारी पथकांची रात्रीची गस्त वाढवून ढाब्यांची तपासणीही केली जाणार आहे. मोठ्या शहरांमध्ये बनावट व्हिस्कीची विक्री होण्याची दाट शक्‍यता असते. त्यामुळे अशा गुन्ह्यांत यापूर्वी केलेल्या कारवाईतील दोषींवर लक्ष ठेवले जाईल. त्याच ठिकाणी पुन्हा बनावट मद्याची निर्मिती होत असल्यास कारवाई केली जाईल, असे राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

गोवा, दीव, दमण आणि मध्य प्रदेशातून रेल्वेमार्गाने होणारी अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांचे सहकार्य घेतले जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे रो-रो सुविधेच्या ठिकाणी यापूर्वी गोव्यात तयार झालेले मद्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले होते. त्याचप्रमाणे जेएनपीटी बंदरात परदेशातून होणाऱ्या मद्याच्या तस्करीवरही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष राहील, असे सांगण्यात आले. 

नाताळ आणि नववर्षाच्या दृष्टिकोनातून राज्यात १२ तपासणी नाकी सुरू केली असून, ४४ भरारी पथकांना अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अन्य राज्यांतून अवैध मद्याची वाहतूक होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. 
- उषा वर्मा, संचालक, अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन शुल्क विभाग

येथे होणार तपासणी
नाका      तालुका   जिल्हा

दापचरी    डहाणू    पालघर
करंजळी    पेठ     नाशिक 
हाडाखेड   शिरपूर    धुळे 
खेडदिगर  शहादा    नंदुरबार 
पुरनाड    मुक्ताईनगर  जळगाव
वरूड      वरूड     अमरावती
मानेगाव टेक  रामटेक   नागपूर 
देवरी      देवराई     गोंदिया
उमरगा     उमरगा    उस्मानाबाद
मंद्रूप     दक्षिण सोलापूर   सोलापूर 
कागल     कागल      कोल्हापूर 
इन्सुली   सावंतवाडी  सिंधुदुर्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT