ITI
ITI 
महाराष्ट्र

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) लवकरच कात टाकणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) लवकरच कात टाकणार आहेत. विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य शिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यासाठी राज्य सरकार, टाटा टेक्‍नॉलॉजीस पब्लिक लिमिटेड आणि सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्कने पाऊल उचलले आहे. राज्यातील ४१७ ‘आयटीआय’साठी राज्य सरकारकडून दीड हजार कोटी रुपये आणि टाटा टेक्‍नॉलॉजीस कंपनीकडून तब्बल १० हजार ५०० कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.

याविषयी मुंबईत नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक, कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, टाटा टेक्‍नॉलॉजीसचे पदाधिकारी सुशील कुमार, पुष्कराज कौलगुड, सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्कचे महासंचालक राजेंद्र जगदाळे या वेळी उपस्थित होते. 

राज्यात ४१७ शासकीय ‘आयटीआय’ आहेत. तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योगांमधील बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण देणे गरजेचे आहे. या संस्थांना अद्ययावत करण्यासाठी राज्य सरकार १ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी देणार असून, टाटा टेक्‍नॉलॉजीस आणि इतर निगडित ३५० कंपन्यांकडून १० हजार ५०० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. पहिल्या टप्प्यात राज्यातील २५० ‘आयटीआय’, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ‘आयटीआय’मध्ये नवीन यंत्रे बसविणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे, नवीन अभ्यासक्रम सुरू करणे ही कामे तीन वर्षांत पूर्ण केली जातील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. राज्यात ४४७ खासगी आयटीआय आहेत, त्यांनी १२ टक्के निधी खर्च करण्याची तयारी दर्शविल्यास टाटा टेक्‍नॉलॉजीसतर्फे त्यांनाही मदत केली जाईल, अशी माहिती राजेंद्र जगदाळे यांनी दिली.

शरद पवार यांचा पुढाकार
राज्यात बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून शरद पवार यांनी पुढाकार घेतला. राज्य सरकार, टाटा टेक्‍नॉलॉजीस कंपनीसह सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्क या सर्वांची एकत्र मोट बांधून पवार यांनी तरुणांना तंत्रकुशल करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. त्यावर लगेच काम सुरू होणार असल्याने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना काळानुरूप अद्ययावत ज्ञान मिळणे शक्‍य होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT