OBC Reservation Marathi News sakal
महाराष्ट्र बातम्या

ओबीसी आरक्षणसंबंधी विधेयकावर अखेर राज्यपालांची स्वाक्षरी!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय (Obc Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर अखेर राज्यपालांनी सही (Governor) केली आहे, त्यामुळं याचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. त्यामुळं आता आगामी निवडणुका पुढे ढकलल्या जातील का? यासंदर्भात आता निवडणूक आयोगीच भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (State Government OBC Reservation Bill finally signed by Governor Bhagat Singh Koshyari)

अजित पवार म्हणाले, मी आपल्याला आनंदाची बातमी सांगतो की, राज्यपालांनी विधेयकावर सही केली आहे. आज यासंदर्भात कायदा सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांना राज्यपालांकडे पाठवण्यात आलं होतं. यासंदर्भात आम्ही राज्यपालांना सर्व बाबी लक्षात आणून दिलं की या अध्यादेशावर तुम्ही सही केली होती. याचं कायद्यात रुपांतर करत असताना सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी एकमतानं हे विधेयक मंजूर केलंलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सुरु होती, त्यात आपण मंजूर केलेल्या विधेयकावर फार काही मत कोर्टानं व्यक्त केलेलं नाही.

हा सर्व विषय सविस्तर ऐकून घेतल्यानतंर राज्यपालांनी यावर सही केल्यानं आता हा विषय संपला आहे. याबद्दल मी राज्यपालांचे आभार मानतो. तसेच त्यांना धन्यवाद देतो. तसेच राज्यातील जनतेचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या पक्षाच्या सर्व आमदारांनी एकमतानं जे विधेयक मंजूर केलं त्यावर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केल्यानं राज्यात एक चांगलं वातावरण तयार झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT