Anandacha Shidha esakal
महाराष्ट्र बातम्या

सामान्यांचा सणही होणार गोड! 'आनंदाचा शिधा'बाबत सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील १ कोटी ७० लाखांहून अधिकांना मिळणार लाभ

Anandacha Shidha scheme : मागील दोन वर्षांपासून गौरी गणपती, दिवाळी, गुढी पाडव्याच्या निमित्ताने आनंदाच्या शिध्याचे वाटप केले जाते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ ः जनसामान्यांनाही सण आनंदाने साजरे करता यावेत यासाठी सुरू करण्यात आलेली ‘आनंदाचा शिधा’ ही योजना गौरी गणपती उत्सवासाठी देखील राज्य सरकार राबविणार आहे. राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत करण्यात येईल.

मागील दोन वर्षांपासून गौरी गणपती, दिवाळी, गुढी पाडव्याच्या निमित्ताने आनंदाच्या शिध्याचे वाटप केले जाते. राज्यातील नागरिकांकडून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने ही योजना यंदाही राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या ‘आनंदाचा शिधा’ संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल यांचा समावेश आहे.

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा आणि १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य़ रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना हा आनंदाचा शिधा मिळेल. प्रती शिधापत्रिका एक शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्यासाठी ५६२ कोटी ५१ लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या संचाचे वाटप ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Died: संघाला जिंकवलं, मात्र जीव गमावला! शेवटचा चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज अचानक मैदानात कोसळला अन्...

Thane News: एकनाथ शिंदे यांच्या होमपीचवर मनसे-ठाकरे गटाचे आंदोलन; ठाण्यातील कोंडी, भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा

US China Relations: आम्हीही ठोस पावले उचलू; ‘१०० टक्के आयातशुल्क’प्रकरणी चीनचे अमेरिकेला प्रत्युत्तर

Navi Mumbai: भुरट्या चोरांवर पोलिसांची नजर! दिवाळीनिमित्त शहरात विशेष पथके तैनात

Ready-To-Wear Sarees : दिवाळीसाठी साड्यांची मोठी मागणी! 'रेडी टू वेअर' साड्यांनी केली तरुणींची सोय

SCROLL FOR NEXT