hackathon 
महाराष्ट्र बातम्या

‘हॅकेथॉन’ला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

पुणे - नवनिर्मितीला चालना देण्यासाठी ‘सकाळ’ने घेतलेल्या हॅकेथॉनला मोठा प्रतिसाद मिळाला. यात तीनशेहून अधिक नवकल्पना सादर करण्यात आल्या. यातील सर्वांत चांगल्या दहा कल्पना आतापर्यंत निवडल्या आहेत.

चांगल्या कल्पनांमध्ये पुण्यातील ‘मायलॅब’ची अनोखी कल्पनाही आहे. ही कल्पना समोर आल्यानंतर तातडीने हालचाली करत त्यांना सरकारी पातळीवर तसेच, जागतिक भागीदारीच्या (समूह म्हणून ९० देशांमध्ये अस्तित्व) दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी पावले उचलली. या स्पर्धेत कोल्हापुरातील अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने ‘थर्मल स्कॅनर’ विकसित केला. सध्याच्या वापरात असलेल्या ‘थर्मल स्कॅनर’पेक्षा याची अचूकता अधिक असून, तो बनवण्याचा खर्च एक चतुर्थांश आहे. 

याचबरोबर आणखी एक अनोखा प्रकल्प डॉ. नीता यांच्या बारामतीतील ‘आर्टआयन रेन अँड क्‍लीन एन्व्हायरो. टेक्‍नॉलॉजी प्रा. लि.’ने पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहकार्याने केला अाहे. 

निगेटिव्ह आयन्सच्या माध्यमातून कोविड-१९ चा विषाणू नष्ट करण्याचा हा प्रकल्प आहे. निगेटिव्ह आयन्स हा सिंथेसिस ऑफ रिऍक्‍टिव्ह ऍक्‍शन स्पिसीजच्या (आरओएस) प्रक्रियेतून विषाणू नष्ट करतो. कोविड- १९ च्या पृष्ठभागावरील बाष्पाचे रूपांतर ‘आरओएस’मध्ये केल्यानंतर तो निगेटिव्ह आयन्सच्या संपर्कात येतो. नंतर त्याचे रूपांतर .०२- (सुपरऑक्‍साईड) ऍनायनमध्ये होऊन त्यातून फेंटॉन रिऍक्‍शनद्वार ओएच (हायड्रोसिल/रॅडिकल) एच२ओ२ तयार होतो. यामुळे कोविड-१९चे हवा आणि पृष्ठभागावरील विषाणू (मानवी शरीराबाहेरील) नष्ट होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nurse Strike: राज्यातील परिचारिकांचा संप, मागण्या मान्य न झाल्यास 'या' तारखेपासून राज्यव्यापी निषेधाची घोषणा, आरोग्य सेवा ठप्प होणार?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी अर्धा तास उशिराची मुभा; सरकारचा निर्णय, कारण काय?

अन् अर्जुनचा साक्षीला चेकमेट! कोर्टात दाखवला 'तो' पुरावा'; सगळेच शॉक, 'ठरलं तर मग'चा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Eknath Shinde : राजकीय समीकरणे बदलणार? येवला तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व वाढतेय

Government Scheme: मुलांच्या पालनपोषणासाठी मिळणार ४००० रुपये, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू, अर्ज कसा करायचा?

SCROLL FOR NEXT