raj thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: ''महाराजांच्या नावाने मतं मागायची अन्...'' मालवणमधील घटनेनंतर राज ठाकरेंचा उद्वेग, पोस्ट केली कुसुमाग्रजांची कविता

Shivaji Maharaj: नौदल दिनानिमित्त चार डिसेंबर २०२३ ला भारतीय नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

मालवण : नौदल दिनानिमित्त राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोसळला. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप त्यावेळी विविध लोकप्रतिनिधी व शिवप्रेमींकडून करण्यात आला होता; मात्र याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप करत शिवप्रेमींनी या घटनेचा तीव्र निषेध केला.

नौदल दिनानिमित्त चार डिसेंबर २०२३ ला भारतीय नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. गेले दोन-तीन दिवस किनारपट्टी भागात वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून कोसळला. स्थानिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी यांची माहिती प्रशासनास दिली. स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली असून, पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

पुतळा उभारणीनंतर पर्यटनाच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने राजकोट किल्ल्यावर बांधकाम केले होते. हे काम निकृष्ट झाल्याचा आरोप नंतरच्या काळात विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी केला होता. पुतळा कोसळण्याच्या घटनेनंतर घटनेनंतर अल्पावधीतच याचे तीव्र पडसाद शहरात उमटले. आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ‘‘पुतळा कोसळला ही दुःखदायी घटना आहे. या किल्ल्याच्या समोरच असलेला किल्ले सिंधुदुर्ग गेली साडे तीनशेहून अधिक वर्षे दिमाखात उभा आहे आणि आठ महिन्यांपूर्वी उभारलेला राजकोट येथील महाराजांचा पुतळा कोसळतो हे दुर्दैवी आहे. याला नौदल विभागासह, सार्वजनिक बांधकामही जबाबदार असून दोषींवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. याची कार्यवाही न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल,’’ असा इशारा त्यांनी यावेळी दिला. शिवप्रेमींनी शांतता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, या घटनेनंतर मालवण पोलिस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

राज ठाकरे यांची पोस्ट

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा?

मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती ?

आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील 'पाच पुतळ्यांवरची' कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे.

मध्यरात्र उलटल्यावर

शहरातील पाच पुतळे

एका चौथऱ्यावर बसले

आणि टिपं गाळू लागले .

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा.

शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ़्यांचा.

आंबेडकर म्हणाले ,मी फ़क्त बौद्धांचा.

टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्त, चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले ,

तरी तुम्ही भाग्यवान.

एकेक जातजमात तरी

तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र

फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

राज ठाकरे पुढे लिहितात...

पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत.

पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे.

ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो. अशी पोस्ट राज ठाकरेंनी शेअर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT