Eknath shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

BRSला रोखण्यासाठी CM शिंदेंनी उचललं पाऊल; के. चंद्रशेखर राव यांच्याआधीच पोहचले विठुरायाच्या दर्शनाला

आषाढी एकादशीच्या दिवशी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पंढपुरात दाखल होणार आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्रात सध्या भारत राष्ट्र समिती आपले वर्चस्व प्रस्थापित करत असल्याचं चित्र आहे. आज (सोमवारी 26 जून) रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव त्यांच्या मंत्रिमंडळासह आमदार आणि खासदारांना घेऊन आज सोलापुरात दाखल होणार आहेत. तर आज राष्ट्रवादीचे नेते भागीरत भालके हे भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. पण त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढपुरात पोहचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (रविवारी 25 जून)नांदेडमधून थेट विमानाने सोलापुरात पोहचले. तसेच त्यांनी पंढरपुरमध्ये पाहणी केली. (Latest Marathi News)

आषाढी एकादशीच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री विशेष अतिथी असतात. त्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा देखील केली जाते. अशातच त्यांनी थेट आषाढी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. काल (रविवारी) मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे पंढपुरात पोहचले होते.(Latest Marathi News)

पूजेसाठी आषाढी सोहळ्याच्या 28 जून रोजी मुख्यमंत्री पंढपुरात दाखल होणार होते. परंतु तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर ते उद्या 27 जून रोजी पंढपुरात दाखल होणार आहेत. पण त्याआधीच मुख्यमंत्री शिंदे पंढपुरात पोहचल्यामुळे के.चंद्रशेखर राव यांच्या खेळीवर पाणी फिरल्याच्या चर्चा सुरू आहेत.(Latest Marathi News)

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान आषाढी निमित्ताने करण्यात आलेल्या सोईसुविधा यांचीही पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच त्यांनी पंढपुरात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा देखील आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी दर्शन रांगेत जाऊन भक्तांशी देखील संवाद साधला. त्यानंतर मंदिर परिसर, भक्तांसाठी निवासासाठी योजना करण्यात आलेल्या 65 एकर तळाची पाहणी करुन ते परतले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs SA W:भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Omprakash Raje Nimbalkar : "१०० कोटी हवेत तर आमच्या किडन्या विकू, पण पक्षांतर करू नका"; उमरग्यातील शिवसैनिकांचे ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना हृदयद्रावक पत्र

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

SCROLL FOR NEXT